पुणे: हडपसर पोलीसांनी (Hadapsar Police Station) दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही सतरा वर्षाची आहे आणि आरोपी बावीस वर्षाचा आहे. आरोपी आणि पिडीत तरुणी हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. काही दिवसांपूर्वी या २२ वर्षीय आरोपीने आपण दोघेही लवकरच लग्न करू असे सांगत पिडीत तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पण याला पिडीत तरुणीने विरोध केला.
त्यानंतर तो दोन वर्षापासून मी तुझ्यावर प्रेम करतोय आणि तुझ्याशी लग्न करणार आहे, अन्यथा मी आत्महत्या करेल अशी भीती दाखवली (Threatening Suicide) आणि पीडित तरुणीची इच्छा नसतानाही हडपसर परिसरातील लॉजमध्ये घेऊन जात तिच्यासोबत शारीरिक संबंध (a relative raped a minor girl) ठेवले. त्यानंतर पिडीत तरुणीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला त्यानंतर आईने हडपसर पोलीस स्टेशन गाठले आणि याप्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी यावरुन गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा : Rape of a minor girl : पुण्यात अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार