ETV Bharat / state

कोरोनाचे संकट : नव्याने विवाह बंधनात अडकणाऱ्या तरुण तरुणींमध्ये नाराजी - विवाह बंधनात अडकणाऱ्या तरुण तरुणींमध्ये नाराजी

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन कडक केले जात आहेत. पुण्यात अनेक भागातील परिसर सील केला जात आहे. अशात नव्याने विवाह बंधनात अडकणाऱ्या तरुण तरुणींना वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. अनेकांच्या लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत.

Impact of coronavirus on new weddings
नव्याने विवाह बंधनात अडकणाऱ्या तरुण तरुणींमध्ये नाराजी
author img

By

Published : Apr 11, 2020, 4:21 PM IST

पुणे - सध्या देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. सर्वत्र लॉकडाऊन कडक केले जात आहेत. तर पुण्यात अनेक भागातील परिसर सील केला जात आहे. अशात नव्याने विवाह बंधनात अडकणाऱ्या तरुण तरुणींना वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. अनेकांच्या लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत. काहींना लग्न मोडतात की काय अशी भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात चांगलीच नाराजी पाहायला मिळत आहे.

Impact of coronavirus on new weddings
नव्याने विवाह बंधनात अडकणाऱ्या तरुण तरुणींमध्ये नाराजी
पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या अगोदर अनेक लग्न ठरलेली असून, अनेकांनी मंगल कार्यालयांची बुकींग, लग्नाची खरेदी केली आहे. तर काही जोडप्यांचे फक्त लग्न ठरवून ठेवली आहेत. लॉकडाऊमुळे लग्नाची खरेदी झाली नाही, अशा परिस्थितीत लॉकडाऊन अजून वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या नव विवाहित होणाऱ्या जोडप्यांवर मोठं संकट ओडावले आहे. सर्वाधिक लग्न मार्च, एप्रिल, मे महिन्यात होत असतात आणि याच काळात कोरोनाचे मोठे संकट जगावर उभं राहिले आहे.
देशातील प्रत्येक नागरिक कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करतायेत. यातच नव्याने लग्न बंधनात अडकणारे तरुण-तरुणी विवंचणेत आहेत. लॉकडाऊन वाढले तर लग्न मोडली जातील की काय अशी भिती पुणे जिल्ह्यातील ग्रामीण ग्रामीण भागात आहे.

लग्न म्हटलं की दोन्ही कुटुंबाकडे मोठी हौस मौस असते. लग्नात सहभागी होणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान करण्यासाठी दोन्हीकडील मंडळी कसलीच कसर सोडत नाही. मात्र, सध्या लग्नाचा कोरोनामुळे बिगाड झाला आहे. हौस-मौस, मान-पान सोडाच पण नवरा नवरीचीही खरेदी झाली नाही. त्यामुळे कधी हे कोरोनाचे संकट दूर होईल, अशा प्रश्नांमध्ये अनेक कुटुंब अडकली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.