ETV Bharat / state

दगडूशेठ गणपतीचे साडेसहाला विसर्जन, घरबसल्या सोहळा असा पाहा ऑनलाईन - गणेशोत्सव 2021

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीचे विसर्जन सूर्यास्ताच्यावेळी सायंकाळी ६ वाजून ३६ मिनीटांनी मंदिरामध्येच होणार आहे. दरम्यान, गणपतीचे प्रत्यक्ष दर्शन बंद आहे. त्यामुळे ऑनलाईन दर्शन घ्यावे लागणार आहे. कसे घेता येईल ऑनलाईन दर्शन? वाचा सविस्तर...

PUNE
pune
author img

By

Published : Sep 19, 2021, 10:42 AM IST

Updated : Sep 19, 2021, 10:55 AM IST

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या १२९ व्या उत्सवात सलग दुसऱ्या वर्षी श्रीं चे विसर्जन व उत्सवाची सांगता मुख्य मंदिरात होणार आहे. अनंत चतुर्दशीला रविवार, दिनांक १९ सप्टेंबर रोजी सूर्यास्ताच्यावेळी सायंकाळी ६ वाजून ३६ मिनीटांनी मंदिरामध्येच विसर्जन होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

दगडूशेठ गणपती ट्रस्टकडून भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय

गणेशभक्तांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करु नये, याकरीता श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने मंदिरामध्येच व ऑनलाईन गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय सलग दुसऱ्या वर्षी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दगडूशेठ गणपती ट्रस्टने व्हर्च्युअल माध्यमांद्वारे केलेल्या श्रींच्या दर्शनसेवेचे पत्राद्वारे कौतुक केल. दगडूशेठच्या श्रींचे विसर्जन देखील मुख्य मंदिरातच होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

रविवारी सायंकाळी अभिषेक होणार आहे. त्यानंतर मंगल आरती होईल. फुलांनी सजविलेल्या पितळ्या कुंडामध्ये श्रीं च्या मूर्तीचे विसर्जन होईल. ट्रस्टच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे विसर्जन होणार आहे.

असा पाहा ऑनलाईन दगडूशेठ गणपतीचा विसर्जन सोहळा

श्रींचे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यूट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण विसर्जन सोहळा ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या https://www.dagdushethganpati.com/live-darshan-01/ या लिंकवरही भाविकांना पाहता येणार आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा - २१७ वर्षांपासून नाईक कुटुंबात पर्यावरणपूरक गणपती बाप्पाचे आगमन

Last Updated : Sep 19, 2021, 10:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.