ETV Bharat / state

अध्यादेश त्वरित मागे घ्या; पुण्यात आयएमएचे देशव्यापी साखळी उपोषण

author img

By

Published : Feb 9, 2021, 9:07 PM IST

Updated : Feb 9, 2021, 10:16 PM IST

पुण्यात सुरू असलेल्या साखळी उपोषणाला आय.एम.एचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे. ए. जयलाल यांनी भेट देऊन सीसीआयएमच्यावतीने आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना 58 शस्त्रक्रिया करण्यास जी मुभा देण्यात आली आहे त्याचा निषेध नोंदवण्यात आला.

ima pune fasting over ccim decision
पुण्यात आयएमएचे देशव्यापी साखळी उपोषण

पुणे - केंद्र सरकारच्या परिपत्रकातील भारतीय औषध केंद्रीय परिषदेच्या सी.सी.आय.एमच्या अध्यादेशानुसार पदव्युत्तर आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना 58 शास्त्रक्रिया करण्यास मुभा देण्याच्या निर्णयाला इंडियन मेडिकल काऊन्सिलने (आयएमए) निषेध केला आहे. याच पार्श्वभूमीवर आयएमएच्यावतीने 1 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत देशव्यापी साखळी उपोषण करण्यात येत आहे.

आएमएचे अध्यक्ष याबाबत माहिती देताना.

पुण्यात सुरू असलेल्या साखळी उपोषणाला आय.एम.एचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे. ए. जयलाल यांनी भेट देऊन सीसीआयएमच्यावतीने आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना 58 शस्त्रक्रिया करण्यास जी मुभा देण्यात आली आहे त्याचा निषेध नोंदवण्यात आला. तसेच हा अध्यादेश त्वरित मागे घेण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच मिश्रवैद्यक उपचार पद्धतीसाठी नेमण्यात आलेल्या एनएमसीची चार सदस्य समिती ताबडतोब बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

देशभरातून 6 लाख सभासद साखळी उपोषणात सहभागी -

1 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत जो देशव्यापी साखळी उपोषण करण्यात येत आहे त्यात आयएमएचे 6 लाख सभासद तसेच एमबीबीएस पदवी व पदव्युत्तरचे विद्यार्थी सहभागी झाले आहे. आयुर्वेदिक पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आधुनिक वैद्यक शास्त्रातील वैविध्यपूर्ण शस्त्रक्रिया अपेंडीसेक्टमी, टॉन्सिलेक्टामी मोतीबिंदू शस्त्रक्रिया अशा शस्त्रक्रिया करण्याची आधुनिक वैद्यक शास्त्रातील जनरल सर्जनना सुद्धा परवानगी नाही मग यांना कशी? या वैद्यांना एमएस पदवी दिल्याने रुग्णांच्या मनात डॉक्टरांच्या पदवी संदर्भात काय संभ्रम निर्माण होईल? असे अनेक प्रश्न उपस्थित रहातात, असेही यावेळी जे. ए. जयलाल म्हणाले.

हेही वाचा - 19 ते 21 फेब्रुवारी 2021 दरम्यान रंगणार वसंतोत्सव

आयुर्वेदिक तज्ज्ञांबरोबर तुलना कधीच होऊ शकत नाही -

कोणतेही ऑपरेशन म्हणजे जीवन मरणाची जोखीम असते. आधुनिक वैद्यक शास्त्रातील सर्जनने शरीररचना आणि शरीरविज्ञानशास्त्र, रोगनिदान शास्त्र, भुलतंत्रशास्त्र इत्यादी अनेक विषयांचा सखोल अभ्यास केलेला असतो. त्या-त्या विषयातील तज्ञ वरिष्ठ सर्जन डॉक्टरांच्या देखरेखीखाली शेकडो शस्त्रक्रिया केलेल्या असतात. तसेच दुर्बिणीतून पोटाच्या विकारांवर शात्रक्रिया करण्यासाठी आणखी काही वर्षे अभ्यास करून अनुभव घेतलेला त्याची तुलना आयुर्वेदिक तज्ञांबरोबर कधीच होऊ शकत नाही. यामुळे पूर्वीपार चालत आलेल्या आयुर्वेद चिकित्सेचा गाभाच उन्मळून पडेल, यात शंका नाही असेही यावेळी जयलाल म्हणाले.

Last Updated : Feb 9, 2021, 10:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.