बारामती - इंदापूर तालुक्यातील काझड गावच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी अचानक छापा टाकला. या कारवाईत दोन ट्रकसह २० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई वालचंदनगर पोलिसांनी काझड आकोले रस्त्यावरील खरातवस्ती येथे केली.
प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल -
याप्रकरणी अल्लाऊद्दिन खैरुद्दिन शेख (मुळगाव शिरसाव, ता.परांडा जि.उस्मानाबाद तर सध्या रा. वाटलुज ता. दौंड जि. पुणे), संतोष आणि नितीन सुनिल लवंगारे (दोन्ही रा. मलटन, ता. दौंड, जि. पुणे), राजु शेंडगे (रा. वाटलुज, ता. दौंड जि. पुणे) यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता व पर्यावरण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - धक्कादायक! गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना मृतदेहांची अदलाबदल
20 लाखांचा मुद्देमाल जप्त -
इंदापूर तालुक्यातील काझड गावच्या हद्दीत वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती वालचंदनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी काझड गावच्या हद्दित काझड-आकोले जाणाऱ्या रोडवर प्राथमिक शाळा खरात वस्तीसमोर रस्त्यावर अचानकपणे छापा टाकला. या कारवाईत २० लाख ८० हजार रुपये किमतीचे २ टाटा कंपनीचे हायवा ट्रक व ८ ब्रास वाळू जप्त केली.
ही कामगिरी वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, उपनिरीक्षक नितीन लकडे, पोलीस नामदार रमेश शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल गोलांडे आदींनी पार पडली.
हेही वाचा - अमरावतीत एकाच कुटुंबातील २ सख्ख्या भावांसह तिघांचा कोरोनाने मृत्यू