ETV Bharat / state

गावठी अवैध दारू विक्रेत्‍या महिलांची संपूर्ण गावाला ठार मारण्याची धमकी, व्हिडिओ व्हायरल - अवैध दारूविक्री

चास गावात दारुबंदी असतानाही एक महिला या गावात बेकायदेशीरपणे हातभट्‍टीची दारू विक्री करत आहे.

दारुचा कॅन फोडताना तरुण
author img

By

Published : May 18, 2019, 12:07 PM IST

Updated : May 18, 2019, 2:09 PM IST

पुणे - भीमाशंकर-राजगुरुनगर रोडवरील चास गावात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या महिलेने संपूर्ण गावाला ठार मारण्याची धमकी दिली आहे. या धमकीचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

दारु गुत्त्यावरील भांडणे

चास गावात दारुबंदी आहे. मात्र, या गावात एक महिला बेकायदेशीरित्या हातभट्‍टीची दारू विक्री करत आहे. त्यामुळे गावातील महिला आणि तरुण या महिलेला जाब विचारायला गेले. यावेळी त्यांनी गुत्त्यावरील दारूचे कॅन फोडून दारू रत्त्यावर ओतली. या घटनेमुळे दारू विक्री करणार्‍या महिलांचा राग अनावर झाला आणि त्यांनी संपूर्ण गावाला ठार मारुन टाकण्याची धमकी दिली.

घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात बेकायदेशीर दारू विक्रीसाठी कोणा-कोणाला पैसे दिले जातात याचा उलगडाच होत आहे. या सर्व प्रकारामुळे संपूर्ण गावामध्ये दहशतीचे वातावरण असून पोलिसांच्या भूमिकेकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

Intro:Anc_भिमाशंकर राजगुरुनगर रोडवर असणा-या चास गावात काही वर्षापुर्वी महिलांच्या संघर्षातुन गावातुन दारुची बाटली आडवी झाली मात्र प्रत्येक्षात गावात दारु अवैधरित्या विक्री होतच राहिली या दारुमुळे आपले संसार उगड्यावर पडत असल्याने या महिला रणरागिनीनी रोद्र्य रुप घेत या दारुबंदी विरोधात संघर्ष केला मात्र अवैध व्यवसायांना प्रोचाहन मिळत असल्याने महिलांचा संघर्ष संपत चालला

गावात दारुबंदी असतानाही एक महिला चास येथील बेकायदेशीर हातभट्‍टीची दारू विक्री करत असताना गावातील महिला व तरुण जाब विचारायला गेलेल्‍या महिलांनाच जीवे मारायची धमकी दिली त्यावरच हे न थांबता संपूर्ण गावालाच मारण्याची धमकी दिल्‍याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे चास गावातील जनता दहशतीखाली आहे.

चास येथील डाव्याकालव्याजवळ असणार्‍या दारू धंद्‍यावर काही महिला व तरूणांनी जावून दारूचे कॅन फोडून टाकले. यावेळी दारू विक्री करणार्‍या महिलांनी तरूणांना जोरदार प्रतिकार केला. यावेळी तरूणांनी दारूचे कॅन जमिनीतून काढून त्‍यातील दारू रस्‍त्‍यावर ओतल्‍याने या महिलांचा राग अनावर झाला, आणि या दारू विक्री करणार्‍या महिलांनी संपूर्ण गावालाच ठार मारून टाकण्याची धमकी दिली. बेकायदेशीर दारू विक्रीसाठी कोणा कोणाला पैसे दिले जातात याचा उलगडाच या व्हिडिओमधून समोर आला आहे. यामुळे गावामध्ये दहशतीचे वातावरण आहे.

दरम्यान या सर्व प्रकारानंतर पोलीसांची भुमिका नक्की काय असणार हेच पहावे लागणार आहेBody:..Conclusion:
Last Updated : May 18, 2019, 2:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.