पुणे - जिल्ह्यात सध्या कोरोनाचे संकट अतिशय गंभीर झाले आहे. त्यामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून संचारबंदी लागू करण्यात आलीय. कार्यालयं बंद आहेत. परिणामी नागरिक घरात अडकून पडलेत. याच काळात पती-पत्नीत भांडण होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे या काळात पत्नीशी भांडण करणाऱ्या पतीला क्वारंटाईन करण्यात येईल, असा इशारा पुणे जिल्हा परिषदेने दिला आहे.
दक्षता समिती यावर उपाययोजना करणार आहेत. जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात पती-पत्नीमध्ये भांडणे होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याची जिल्हा परिषदेने तातडीने दाखल घेतली असून भांडखोर नवऱ्याला क्वारंटाईन करण्यात येणार आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील शाळा, अंगणवाडीमध्ये या नवऱ्याला क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांना त्रास देऊ नका, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेने केले आहे.