पुणे Koyta Bandh Agitation : ऊसतोडणी आणि वाहतुकीच्या दर वाढीबाबत ऊसतोडणी कामगारांकडून गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मागणी केली जात आहे. (Jai Bhagwan Sugarcane Federation) याबाबत सरकारला ऊसतोड कामगार तसंच विविध संघटनांच्या वतीनं आजचं अल्टिमेटम देण्यात आलं होतं. आज जर सरकारनं निर्णय नाही घेतला तर ऊस वाहतुकदार, मुकादम यांचा ऊसतोडणी भाववाढीसाठीचा संप असाच पुढे सुरू राहील आणि येत्या 5 तारखेला कोयता बंद करण्याचा (Sugar Association) इशारा जय भगवान ऊसतोड महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिला आहे.
तर कोयताबंद करू, संघटनेचा इशारा : ऊसतोडणी संघटना आणि साखर संघ यांच्यात दर तीन वर्षांनी ऊसतोडणी आणि वाहतुकीचे दर ठरवले जातात; पण आता मुदत संपली असून नवीन करार करण्यासाठी साखर संघासोबत आतापर्यंत दोन ते चार बैठका पार पडल्या आहेत. पहिल्या बैठकीमध्ये 7 टक्के, दुसर्या बैठकीमध्ये 24 टक्के आणि तिसर्या बैठकीमध्ये 27 टक्के भाववाढ देण्याचा प्रस्ताव साखर संघाने ठेवला आहे. याबाबत आज निर्णय होणार होता. मात्र अजूनही निर्णय झालेला नाही. आज भाववाढ दिली नाही तर येत्या 5 तारखेला थेट कोयता बंद करू असा इशारा यावेळी सानप यांनी दिला आहे.
सरकारने भाववाढीचा निर्णय घ्यावा : आज राज्यात ऊसतोडणी, वाहतूकदार, मुकादम यांच्या सर्व संघटना 50 टक्के भाववाढ झाली पाहिजे या मागणीवर ठाम असून ऊसतोडणी मजुरांना 237 रुपयांवरून आता 273 रुपये एवढी टनाला तोडणी दिली जात आहे. असं असताना शेजारील राज्यात महाराष्ट्रापेक्षा ऊसतोडणी आणि वाहतुकीच्या दरात मोठी तफावत आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील मजूर दुसर्या राज्यात ऊसतोडणी, वाहतुकीसाठी जात आहेत. मजुरांअभावी राज्यातील सगळ्या कारखान्यांना पाहिजे तेवढा ऊसपुरवठा केला जाऊ शकत नाहीत. अशी परिस्थितीती असताना सरकारने तात्काळ भाववाढीचा निर्णय घ्यावा असं देखील सानप म्हणाले.
संघर्ष तीव्र करण्याची तयारी : ऊस तोडणी कामगारांच्या संदर्भात साखर संघ आणि मजूर संघटना यांच्यामध्ये जो करार झालेला आहे त्या करारातल्या अन्य काही गोष्टीबाबत सरकारसुद्धा उदासीन आहे. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांच्या मुलांचे प्रश्न, कामगारांच्या आरोग्याचे प्रश्न, बैलगाडीच्या बैलांचे प्रश्न, कामगारांच्या विम्याचा प्रश्न या सर्व गोष्टींबाबत लवकरच एक कृती कार्यक्रम तयार करून महाराष्ट्रात अधिक तीव्रपणे याबाबतचा संघर्ष करण्याची तयारी कामगार संघटनांनी केलेली आहे.
हेही वाचा: