ETV Bharat / state

Ajit Pawar On SC Verdict : सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितले - Ajit Pawar On SC Verdict

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (गुरुवारी) सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बोलण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. मी माहिती घेतो. मला निकालपत्र वाचण्याससुद्धा वेळ मिळाला नाही. त्यामुळे मी बोलणार नाही. मी त्यावर उद्या बोलेल; परंतु मी दिल्लीला गेलो नाही एवढेच सांगा, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केलेली आहे.

Ajit Pawar On SC Verdict
अजित पवार
author img

By

Published : May 11, 2023, 8:38 PM IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अजित पवारांची प्रतिक्रिया

पुणे: काल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी बोलताना अजित पवार यांनी लातूरमध्ये म्हटले की, 16 आमदार अपात्र झाले तरी सरकारकडे बहुमत असेपर्यंत सरकारला कुठलाही धोका नाही. मी बोललो त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे. मला जे वाटले ते बोललो आणि तसा निकालसुद्धा आलेला आहे. मी आणखी निकालपत्र वाचले नाही. त्यामुळे मी यावर बोलणार नसल्याचे अजित पवार यांनी आज पुणे येथे म्हटले आहे.

पवार कुणाची भूमिका घेणार? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार काय प्रतिक्रिया देणार? याची उत्सुकता महाराष्ट्रात होती. त्यांच्या सगळ्या वेगवेगळ्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा सुरू असताना अजित पवार आता नेमकी कुणाची भूमिका घेणार? असा प्रश्न महाराष्ट्रातील जनलेला पडला होता. याबाबत पवारांनी स्पष्ट सांगितले होते की, 16 आमदार अपात्र झाले तरी 145 हा आकडा आहे तोपर्यंत कोणीही सरकार पाडू शकत नाही. तशीच काहीशी प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालात दिसत असल्याने पवारांच्या भाष्याकडे राजकारण्यांचे लक्ष लागले होते.

पत्रकारांशी न बोलताच पवार निघाले: अजित पवार नेहमी दिल्लीला गेलो नाही एवढेच सांगा, अशी मुश्किल टिप्पणी करतात. पुण्यातील विमानतळावर आज अजित पवार आले होते. यावेळी ते पत्रकारांशी न बोलताच निघून गेले; पण औपचारिक गप्पांमध्ये त्यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे.

कार्यक्रमांची दिली माहिती: काल अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना झाले आणि दिल्लीवरून परत आले अशीही चर्चा सुरू होती; मात्र रात्री अजित पवार यांनी प्रसिद्धीपत्रकच थेट प्रसार माध्यमांच्या कार्यालयांना पाठवले. आपण आज मुंबईतच आहोत, उद्या दौंडला, परवा दिवशी बारामतीला आहोत अशा स्वरूपात त्यांनी 12 मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम प्रसिद्धी माध्यमांना कळवले.

अजित पवारांचे काम वेगाने: यानंतर देखील प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा कमी झाल्या नाहीत. मात्र आज दुपारी जेव्हा शरद पवार गोविंद बागेत आले आणि त्यांना पत्रकार भेटले, तेव्हा एक वेगळीच चर्चा झाली. शरद पवार यांना जेव्हा अजित पवार यांच्या या संदर्भात प्रश्न विचारले, तेव्हा शरद पवार म्हणाले, अजित पवार हे वेगाने कामे करण्यात प्रसिद्ध आहेत. काही लोकांना मीडियासमोर चमकण्याचा छंद असतो. काही लोकांना वृत्तपत्रांमध्ये नावे यावी यासाठी ते कामे करतात. तर काही लोक फक्त कामे करण्यासाठी प्रसिद्ध असतात. अजित पवार हे मीडिया फ्रेंडली नाहीत हे सर्वांना माहिती आहे. मी देखील जेव्हा कोणी भेटते तेव्हा त्यांची चर्चा करतो. याचा अर्थ असा नसतो की, त्या चर्चा राजकीय असतात; मात्र अजित पवार जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांचा गैर अर्थ काढला जातो. माझी सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया अजित पवारांच्या बाबतीत चुकीची वृत्त पसरवू नका, असे शरद पवार म्हणाले.

हेही वाचा:

  1. Maharashtra Political Crisis : ठाकरे गटाने शिंदे, फडणवीसांना शिकवला नैतिकतेचा धडा; सरकारनेही दिले उत्तर, 'नैतिकता'चे राजकारण शिगेला
  2. Imran Khan Arrested: इम्रान खानच्या अटकेनंतर पाकिस्तानवर काय परिणाम होणार? खास रिपोर्ट
  3. CM DCM on SC Verdict : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; आम्ही समाधानी, नैतिकता आम्हाला शिकवू नका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.