पुणे - पत्नीवर पती आणि त्याच्या मित्राने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील मार्केट यार्डजवळील परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. महिलेच्या पतीसह त्याच्या ५ मित्रांनी आळीपाळीने बलात्कार केला आहे.
आरोपी पीडितेला करायचा मारहाण - शैलेंद्र कुमार, अतिशय कुमार, पवन राजेंद्र परदेशी, जितेंद्र कुमार, विजय बन्सी पवार आणि पीडितेचा पती या नराधम संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपीचे मार्कट यार्ड परिसरातील एका २३ वर्षीय मुलीसोबत लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपी हा पीडितेला नेहमी मारहाण करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून पीडिता माहेरी गेली होती.
गुन्हा दाखल - याबाबत मार्केटयार्ड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या २३ वर्षाच्या मुलीचा औरंगाबाद येथील गारखेडा येथे विवाह झाला होता. पतीकडून पत्नीला वारंवार मारहाण होत असल्यास तिच्या वडिलांनी तिला घरी परत आणले होते त्यावेळी कुटुंबातल्या या त्रासासाठी कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करून आरोपपत्र दाखल झाले होते. पुण्याच्या घरी आल्यानंतर महिलेने सर्व माहिती कुटुंबीयांना दिली होती.
वारंवार केला अत्याचार - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 फेब्रुवारी 2022 रोजी ही महिला तिच्या वडिलांच्या घरी असताना 20 फेब्रुवारी 2022 रोजी पतीने घराबाहेर यायला सांगितले. तिला घराजवळील झुडपामध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तिला हाताने व काठीने मारहाण केली. त्यानंतर त्याच्या मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. त्याचे त्यांनी मोबाईलवर व्हिडिओ केले. त्यांनी २०२० व २०२१ मध्ये वारंवार बोलावून गाडीमध्ये तिच्यावर सर्वांनी वारंवार बलात्कार केला.
व्हिडिओ व्हायरलची धमकी - रेकॉर्ड केलेले व्हिडिओ, फोटो आरोपीने आपल्याकडे ठेवून त्या महिलेला धमकी दिली. जर कुणाकडे तक्रार केली किंवा पोलिसांकडे गेली तर हे सर्वत्र आम्ही व्हायरल करणार असल्याची धमकी आरोपींनी पीडितेला दिली. या पुढील तपास पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.
हेही वाचा -
- Cow Rescued In Thane : ग्रामीण पोलिसांनी गो-तस्करांच्या तावडीतून ५० जनावरांची केली सुटका, एकाला अटक
- Mumbai Crime News : कुत्र्यांना खायला घालणे पडले महागात..महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला
- Attacked On Shiv Sena Samajwadi Leader: शिवसेनेचे समाजवादी नेते राजीव महाजन यांच्यावर पंजाबमध्ये गोळ्या झाडून हल्ला