पुणे - घरगुती वादातून पतीने केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू ( Wife Dies in Beating ) झाल्याची घटना घडली आहे. खडक पोलीस स्टेशनच्या ( Khadak Police Station ) हद्दीतील भवानी पेठेतील गुलटेकडी ( Gultekdi ) परिसरातून ही घटना उघडकीस आली आहे. आसमा तौसिफ हवारी/शेख (वय 27) असे हत्या झालेल्या विवाहितीचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. पोलिसांनी पती तौफिक नूरहंसन हवारी/शेख याला ताब्यात घेतले आहे.
मुलांच्या तक्रारीवरुन सातत्याने भांडण
मिळालेल्या माहितीनुसार मृत आसमा हवारी-शेख तिच्या कुटुंबियांसोबत भवानी पेठेतील गुलशन बेकरीच्या मागे वास्तव्यास होती. आरोपी पती तौफिक हा सलूनच्या दुकानात काम करतो. या दोघांना दोन अपत्य आहेत. मुलांमध्ये होणाऱ्या भांडणाच्या तक्रारी पत्नी आसमा सातत्याने पतीला सांगत असे. मुलांच्या तक्रारीवरुन त्यांच्यात सातत्याने भांडणेही होत असे. घटनेच्यावेळी रात्रीही पत्नी आसमाने पतीला मुलांमध्ये होत असलेल्या भांडणांविषयी सांगितले. त्याचवेळी जेवण करत असलेल्या पतीने मला शांततेने जेवण तरी करून देता का? असे म्हटले यावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. याचवेळी चिडलेल्या पतीने पत्नी आसमाला मारहाण करण्यास सुरुवात केली. याच मारहाणीत तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली.