ETV Bharat / state

पुणे : पत्नीचा होता पतीच्या चारित्र्यावर संशय, दगड-काठीने मारहाण करुन त्याने संपवली कहानी - पत्नी

आंबेगाव तालुक्यातील गोहे या आदिवासी गावात पत्नी वारंवार पतीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे.

पुण्यात पतीकडून पत्नीचा खून, आरोपी फरार
author img

By

Published : May 13, 2019, 1:14 PM IST

पुणे - सुखी संसाराचे स्वप्न उराशी घेऊन पती-पत्नी लग्न बंधनात अडकतात. सात जन्माच्या गाठी बांधतात आणि आपल्या सुखी संसाराला सुरुवात करतात. मात्र, याच सुखी संसाराला चारित्र्याच्या संशयाची नजर लागते, अन संसाराची राखरांगोळी होते. असाच काहीसा प्रकार आंबेगाव तालुक्यातील गोहे या आदिवासी गावात घडला आहे. पत्नी वारंवार पतीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे.

सानिका संदिप करवंदे, असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. संदिप व सानिकाच्या विवाहानंतर काही दिवसांतच पत्नी सानिका आपला पती संदिप याचे बाहेर परस्त्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेत होती. त्यामुळे दोघांमध्ये अनेकदा वाद झाला होता. हाच राग मनात धरुन संदिपने काल दुपारच्या सुमारास पत्नी सानिकाचे हात पाय बांधुन दगड व काठीने जबर मारहाण केली.

यामध्ये सानिका गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पती संदिप फरार झाला असून सानिकाची आई रेऊबाई तिटकारे यांच्या तक्रारीवरुन संदिपवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी घोडेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

Intro:Anc__सुखी संसाराचे स्वप्न उराशी घेऊन पती-पत्नी लग्न बंधनात अडकुन सात जन्माच्या गाठी बांधतात आणि आपल्या सुखी संसाराला सुरुवात करतात मात्र याच सुखी संसाराला "चारित्र्याच्या" संशयाची नजर लागते अन संसाराची राखरांगोळी होते असाच प्रकार आंबेगाव तालुक्यातील गोहे या आदिवासी गावात घडलाय..पतीच्या चारित्र्यावर पत्नी संशय घेऊन दोघांमध्ये अनेकदा भांडणे होत असताना पतीने पत्नीला बांधुन काठी व दगडाने मारहान करुन जखमी करुन पत्नीचा खुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सानिका संदिप करवंदे असे खुन झालेल्या पत्नीचे नाव आहे ..

संदिप व सानिकाचा विवाहानंतर काहीच दिवसांत पत्नी सानिकाने आपला पती संदिप याचे बाहेरील परस्त्री बरोबर विवाहबाह्य संबंध असल्याचे बोलत संदिपवर संशय घेत असताना दोघांमध्ये अनेकदा भांडणे झाली होती हाच राग मनात धरुन संदिपने काल दुपारच्या सुमारास पत्नी सानिकाचे हात पाय बांधुन दगड व काठीने जबर मारहाण केली यामध्ये सानिका गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यु झाला त्यानंतर पती संदिप फरार झाला असुन सानिकाची आई रेऊबाई तिटकारे यांच्या फिर्यादीवरुन संदिपवर खुनाचा गुन्हा दाखल केला असुन घोडेगाव पोलीस पुढील तपास करत आहे..

दरम्यान जग चंद्रावर चाललं असताना आजही सुखी संसाराची स्वप्न रंगविणारे आजही चारित्र्यसंपन्न असतानाही संशयाच्या फे-यात जाऊन टोकाचे पाऊल उचलत असतील हे पुढच्या पिढीला घातक आहे.Body:...Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.