ETV Bharat / state

Husband Suicide : गर्भवती पत्नीचा मृत्यू डोळ्याने पाहिला ; पतीनेही केली आत्महत्या - पतीनेही धसका घेऊन संपवली जीवन यात्रा

गर्भवती महिलेच्या डोक्यावरून टॅक्टरचे चाक गेल्याने तिचा जागेवरच मृत्यू (death of pregnant wife in Pune) झाला. हा तिचा मृत्यू पतीने स्वत:च्या डोळ्याने पाहिला होता. तो धक्का सहन न झाल्याने पतीने विषारी औषध पिऊन स्वत:ची जीवनयात्रा संपवली (husband suicide after death of pregnant wife) आहे.

husband committed suicide
गर्भवती पत्नीचा मृत्यूनंतर पतीने आत्महत्या केली
author img

By

Published : Nov 18, 2022, 11:35 AM IST

Updated : Nov 18, 2022, 11:45 AM IST

पुणे : मागच्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील नारायणगांव येथे दवाखान्यात तपासणीसाठी एक गर्भवती महिला आणि तिचा पती तपासणीसाठी आले होते. मात्र ती महिला स्पीड ब्रेकर आले म्हणून रस्त्याच्या कडेला उभी होती. समोरून जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा तिला धक्का लागल्याने ती खाली पडली आणि तिच्या डोक्यावरून टॅक्टरचे चाक गेल्याने तिचा जागेवरच मृत्यू (death of pregnant wife in Pune) झाला. हा तिचा मृत्यू पतीने स्वत:च्या डोळ्याने पाहिला होता. त्यामुळे तिचा पती काही दिवसांपासून धक्क्यातून सावरला नव्हता. तो धक्का सहन न झाल्याने पतीने विषारी औषध पिऊन स्वत:ची जीवनयात्रा संपवली (husband suicide after death of pregnant wife) आहे.

आठ महिन्यांपूर्वी विवाह : जुन्नर तालुक्यातील धोंडकरवाडी येथे ही घटना घडली आहे. रमेश नवनाथ कानसकर (वय २९, राहणार धोंडकरवाडी , निमदरी ता.जुन्नर ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. विद्या आणि रमेश यांचा आठ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. त्यानंतर ती चार महिन्यांची गर्भवती होती. त्यामुळे तिची डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू (husband committed suicide) होती.

गर्भवती पत्नीचा मृत्यूनंतर पतीने आत्महत्या केली

नादुरुस्त रस्त्याने बळी घेतला : १४ तारखेला रमेश आपल्या पत्नी आणि सासूला दुचाकीवरून घेऊन डॉक्टरांकडे तपासणी करून खरेदी करून घरी जात असताना वारुळवाडी येथे आल्यानंतर ऊस घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा धक्का दुचाकीला लागला. यामुळे विद्या खाली पडून तिच्या डोक्यावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तेव्हापासून रमेश तणावाखाली होता. तसेच त्याने मागच्या दोन दिवसांपासून अन्न आणि पाणी देखील सोडले होते. त्याने बुधवारी रात्रीच्या सुमारास विषारी औषध घेऊन स्वतःला संपवले. यामुळे आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या संसाराचा अरुंद आणि नादुरुस्त रस्त्याने बळी घेतला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली (Husband Suicide) आहे.

Last Updated : Nov 18, 2022, 11:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.