पुणे - पुणे शहरातील कात्रज कोंढवा रोडवर आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. पती- पत्नी दुचाकीवर दहाव्याच्या कार्यक्रमाला दुचाकीवर जात असताना एका अज्ञात वाहन चालकाने धडक दिली. या दोन्ही पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात ज्ञानेश्वर वाल्मीक लवांडे वय 50 वर्षे (राहणार कपिल मल्हार बाणेर गाव पुणे) आणि उषा ज्ञानेश्वर लवांडे (वय ४५ वर्ष राहणार पुणे) अशी मृत झालेल्या जोडप्यांची नावे आहेत.
पुण्यातील कात्रज कोंढवा रोडवर नेहेमीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. अनेक छोटे-मोठे अपघात देखील या रस्त्यावर होतातआज सकाळच्या वेळेस ज्ञानेश्वर आणि उषा हे त्यांच्या नातेवाईकाच्या दहाव्याच्या कार्यक्रमानिमित्त बाणेरवरून पुरंदरला जात होते. कात्रज कोंढवा रोड कोंढवा बुद्रुक येथे त्यांना एक अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेमध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. कोंढवा पोलीस धडक दिलेल्या वाहनाचा शोध घेत आहेत. अपघाताची माहिती मिळताच कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पती-पत्नीचा मृतदेह शवविच्छदेनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
गुजरातमध्ये भीषण अपघात - नुकतेच बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना बसने चिरडल्याने तब्बल 10 प्रवाशांचा गुजरातमध्ये मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता, की बस स्टँडजवळ मृतदेहांचा ढीग पडला होता. या अपघातात अनेक नागरिक गंभीर जखमी झाल्याने परिसरात भीती पसरली होती.
नागपूरमध्ये विचित्र अपघात- नुकतेच नागपूर येथून वर्ध्याकडे जाणाऱ्या तीन बस एकमेकांना मागून धडकल्याने विचित्र अपघात झाला. टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला मागून येणाऱ्या बसने जबर धडक दिली. यात धडक देणाऱ्या बसचा चालक गंभीर जखमी झाला. बसमधील वाहकासह पंधरा प्रवाशी जखमी झाल्याने एकच गोंधळ उडाला. हा अपघात नागपूर वर्धा महामार्गावरील जंगलापूर शिवारात झाला. प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पाहायला मिळाले.
हेही वाचा
Parbhani News: सेप्टिक टँक साफ करताना पाच मजुरांचा मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल
सविस्तर माहिती थोड्याच वेळात