पुणे : नूतन वर्ष काही तासांवर येऊन ठेपले (new year 2023) आहे. तरुणाई नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी उत्साही झालेली आहे. यामुळेच पिंपरी- चिंचवडमधील हॉटेल मालक देखील मोठ्या तयारीत आहेत. कोरोनामुळे दोन वर्षे नूतन वर्षाचे स्वागत नियमांच्या चौकटीत राहून केले. यावर्षी देखील कोरोनाच संकट घोंगावत असले तरी तरुणाई मात्र नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ठाम (hotel owner ready to welcome) आहे. हॉटेल मालकांनी याची जोरदार तयारी केली असून हॉटेल्स, पबमध्ये जोरदार तयारी झालेली आहे. राज्य उत्पादन शुल्क पुणे यांच्याकडून जिल्ह्यातील मद्यप्रेमीला एक दिवसाचा मद्य घेण्यासाठी परवाना दिला जातो आहे. त्याच स्वागत हॉटेल मालकांनी केले असून कोरोनांचे नियम पाळूनच नूतन वर्षाचं स्वागत करावे, असे आवाहन केले जात (preparations in hotels and pubs) आहे.
नूतन वर्षाचं स्वागत : गेली दोन वर्षे कोरोनामुळे तरुण, तरुणांना नूतन वर्षाचे स्वागत करता आले नाही. पण, यावर्षी निर्बंधामुक्त नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुण, तरुणी सज्ज झाल्या (welcome new year 2023 preparations) आहेत. पिंपरी- चिंचवडमधील पिंपळे गुरव येथे असलेले 'टिटोज' हॉटेलमध्ये हजारो तरुण, तरुणींनी बुकिंग केले असून मद्यपान करून थिरकण्याच्या तयारीत आहेत. यावर्षी मोठ्या प्रमाणावर बुकिंग ( New year celebration in Pune ) होण्याची शक्यता आहे. कारण, दोन वर्षे कोरोनात गेली. त्यामुळे यावर्षी तरुण, तरुणी मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. सध्या हजारच्या जवळपास बुकिंग झाले असून सर्वांनीच कोरोनाबाबत खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन टिटोजचे मालक सागर परदेशी यांनी केले आहे. तर, दारूच्या नशेत चिंब होणाऱ्या तरुणाईने आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, इतकी काळजी घ्यावी हे तितकेच खरे (hotels and pubs in Pune) आहे.
नवीन वर्षाचा पहिला दिवस : वर्षाच्या पहिल्याच दिवशी देवाची पूजा केल्याने संपूर्ण वर्ष चांगले जाते. नवीन वर्षात लोक देवाकडे सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्याची कामना करतात. नवीन वर्षाच्या दिवशी अनेक मंदिरे, गुरुद्वारा आणि चर्चमध्ये विशेष तयारी केली जाते. या दिवशी येथे अनेक प्रकारचे भोग देवाला अर्पण केले जातात. अनेक ठिकाणी गाजराचा हलवा, बुंदीचे लाडू, पेढे इत्यादींचा नैवेद्यही तयार केला जातो. नवीन वर्ष सुरू होताच घंटा आणि शंखनादाचा गजर केल्या जातो. अनेक तरुण नववर्षाच्या दिवशी पार्टीला जाण्याऐवजी मंदिरात आणि कोणत्याही धार्मिक स्थळी जाणं पसंत करतात. या तरुणांची संख्या फार कमी आहे असे नाही. पण आजही या बदलत्या युगात पूजा-अर्चा करणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या बऱ्यापैकी आहे आणि नववर्षाच्या दिवशी सर्वजण मिळून भक्तीसह प्रसादाचा आनंद घेतात. नवीन वर्षाची सुरुवात देवाचे आर्शिवाद घेऊन केल्यास, संपुर्ण वर्षे चांगले आणि सकारात्मक जाते, अशी अनेक लोकांची श्रध्दा असते.