ETV Bharat / state

कोरोना विरुद्ध लढणाऱ्या तीन हजार कार्यकर्त्यांचा जीवनावश्यक साहित्य देऊन सन्मान - pune corona update

भाजपने लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्यांना पुण्यामध्ये ८ दिवस पुरेल इतके २ लाख ३० हजार किट दिले आहेत. यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व परिस्थिती लक्षात घेता गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

chandrakant patil
कोरोना विरुद्ध लढणाऱ्या तीन हजार कार्यकर्त्यांचा जीवनावश्यक कीट देऊन सन्मान
author img

By

Published : May 6, 2020, 8:33 PM IST

पुणे - कोरोनाच्या लढाईत सामान्य माणसांप्रमाणे राजकीय पक्षाचे आणि गणेशोत्सव मंडळाचे कायकर्ते देखील जगले पाहिजेत. प्रत्यक्ष काम करणाऱ्या केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांनाच नाही, तर गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते, पोलीस, डॉक्टर्स, पत्रकारांना नगरसेवक रासने यांनी जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन सन्मानित केले आहे. कार्यकर्ता हा देखील कोरोना वॉरिअर आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी स्वत: किंवा दानशूरांकडून रस्त्यावरील कार्यकर्त्यांचा आरोग्य विमा काढायला हवा, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

कोरोना विरुद्ध लढणाऱ्या तीन हजार कार्यकर्त्यांचा जीवनावश्यक कीट देऊन सन्मान

नगरसेवक आणि स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मित्र परिवारतर्फे बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर संस्थेच्या प्रांगणातून कोरोना लढाईत प्रत्यक्ष काम करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या आणि पुण्यातील १ हजार गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकत्यांसह पोलीस, डॉक्टर्स, पत्रकार असे ३ हजार जणांना टप्याटप्याने जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन कार्यकर्ता सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्य आयोजक श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व स्थायी समिती अध्यक्ष नगरसेवक हेमंत रासने, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, राजेश पांडे, राजेश येनपुरे, प्रमोद कोंढरे उपस्थित होते.

पाटील म्हणाले, भाजपने लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्यांना पुण्यामध्ये ८ दिवस पुरेल इतके २ लाख ३० हजार किट दिले आहेत. यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व परिस्थिती लक्षात घेता गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर गणपती उत्सव चालतो, त्यांचे घर कसे चालेल हे आपण पहायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

हेमंत रासने म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध करणे शक्य झाले. या काळात प्रत्येक कार्यकर्ता गरजूंसाठी कार्यरत आहे. विद्यार्थी, प्रवासी, मजूर, हातावर पोट असलेल्यांची उपासमार होऊ नये, यासाठी भाजपाने व गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काम केले. त्यामुळे या कार्यकर्त्यांचा सन्मान २५ किलो किटमध्ये २५ प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू देऊन करण्याचा आम्ही संकल्प केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.