ETV Bharat / state

स्पेशल : पुण्याचं वैभव जपण्यासाठी राष्टीय खेळाडू झाले गणेश मूर्ती विक्रेते - राष्ट्रीय हॉकी खेळाडू

गणेशोत्सव पुण्याचे वैभव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सवही साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत गणेशोत्सवात सर्वांना घरच्या घरी 'बाप्पा'ची मूर्ती मिळावी, म्हणून येथील पाच राष्ट्रीय खेळाडू एकत्र आले आहेत. सचिन भोंडवे, गौरव कांबळे, जितेश पनचाल, राहुल झोरे आणि अमर खराडे अशी पाच मित्रांची नावे आहेत.

hockey player become ganesh murti saler to save glory of pune ganeshotsav
पुण्याचं वैभव जपण्यासाठी राष्टीय खेळाडू झाले गणेश मूर्ती विक्रेते
author img

By

Published : Aug 8, 2020, 4:24 PM IST

पुणे - गणेशोत्सव पुण्याचे वैभव आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सवही साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. कोरोनावर आळा घालण्यासाठी सर्वच सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत गणेशोत्सवात सर्वांना घरच्या घरी 'बाप्पा'ची मूर्ती मिळावी, म्हणून येथील पाच राष्ट्रीय खेळाडू एकत्र आले आहेत. पुण्यातील गोखलेनगर येथे राहणाऱ्या या राष्ट्रीय हॉकीपटूंनी एकत्र येत ऑनलाईन आणि स्टॉलच्या माध्यमातून गणपती बाप्पाच्या मूर्ती विक्रीला सुरुवात केली आहे. सचिन भोंडवे, गौरव कांबळे, जितेश पनचाल, राहुल झोरे आणि अमर खराडे अशी पाच मित्रांची नावे आहेत.

'पुण्याचं वैभव जपण्यासाठी राष्टीय खेळाडू झाले गणेश मूर्ती विक्रेते'

सध्या कोरोनामुळे लोकांना आधीच्या तुलनेत अधिक आर्थिक चणचण भासत आहे. त्यात मुर्ती महाग झाल्या आहेत. काहींना मूर्ती हवी आहे. मात्र, बाहेर पडता येत नाही आहे. अशा सर्व लोकांसाठी हे खेळाडू स्वस्त आणि घरपोच मुर्ती विकत आहेत. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग आणि शासनाने दिलेल्या नियमावलीचे नियम पाळले जात आहेत. आतापर्यंत त्यांनी दीडशेहून अधिक मुर्ती विकल्याचे या खेळाडूंनी सांगितले.

या पाचही मित्रांनी मॉडर्न हायस्कुलमध्ये शिक्षण घेतले आहे. हे पाचही जण ग्रीन मेडॉल्स या क्लबमधून हॉकीचा सरावही करतात. या सर्वांनी महाराष्ट्र संघाकडून राष्ट्रीय स्तरावर हॉकीचे सामने खळले आहे.

सध्या कोरोनामुळे सर्वच काही बंद आहे. ग्राउंडवर सरावही बंद आहे. अशा परिस्थितीत पाचही मित्रांनी एकत्र येत गणेश मूर्ती विकायचे ठरवले. दरवर्षी गणेशोत्सवात ते त्यांच्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती बसवायचे. मात्र, यंदा कोरोनामुळे लोकांना बाहेर जास्त निघता येत नाही. लोक आजही घराबाहेर पडायला घाबरत आहेत. म्हणून त्यांनी ऑनलाईन आणि त्यांच्या भागातील लोकांसाठी स्टॉलच्या माध्यमातून मूर्ती उपलब्ध करुन दिल्या आहेत.

खेळाडूंच्या भावना -

पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आमच्या परिसरातील नागरिकांनी बाहेर जायला नको, म्हणून त्यांना एकाच ठिकाणी आकर्षक मूर्ती आम्ही उपलब्ध करुन दिल्या आहेत. कोरोनाच्या या परिस्थितीत आज प्रत्येक जण एकमेकांपासून दूर जात आहे. मात्र, आम्ही मित्रांनी एकत्र येत लोकांना आकर्षक आणि कमी किंमतीत बाप्पाच्या मूर्ती मिळाव्या म्हणून हा व्यवसाय सुरु केला आहे. याठिकाणी नागरिकांसाठी पुणे शहरातील मानाच्या आणि विविध मंडळांच्या मूर्तींची प्रतिकृती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

पुणे शहराचे वैभव असलेला गणेशोत्सव कोरोनाच्या या महासंकटातही प्रत्येक पुणेकरांच्या घरोघरी पोहचावा, म्हणून एक छोटासा प्रयत्न आम्ही खेळाडूंनी केला आहे. कधीही हॉकीशिवाय दुसरा विचार न करणारे आम्ही पाचही जण आज मूर्ती विकत आहोत. मात्र, आमची आर्थिक परिस्थिती खराब आहे म्हणून नाही तर लोकांना बाप्पा आपल्या घरी बसवता यावा, म्हणून आम्ही मूर्ती विकत आहोत, अशा भावना या खेळाडूंनी व्यक्त केल्या.

खेळाडूंनी व्यक्त केली खंत -

पुण्यात गेल्या तीन-चार वर्षांपासून हॉकीच्या मोठ्या स्पर्धा आयोजित झाल्या नाहीत. हॉकी असोसिएशन हॉकीच्या मॅचेस आयोजित करत नाही. असोसिएशन सांगते की, आम्हांला मैदान उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत अनेक हॉकीपटू घरीच आहेत, अशी खंत या खेळाडूंनी यावेळी व्यक्त केली. म्हणून येथील खेळाडूंना वाव मिळावा यासाठी याठिकाणी हॉकीचे सामने आयोजित करण्यात यावेत, अशी मागणी या खेळाडूंनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.