पुणे - शहर आणि परिसरात आज (मंगळवारी) रात्री ९ वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मागील दोन दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यानंतर या पावसामुळे पुण्यात गारवा निर्माण झाला आहे. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची त्रेधातिरपीट उडाली. काही भागात तर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. काही भागातील वीजही या पावसात गुल झाली.
हेही वाचा - सणाच्या मोठ्या सेलकरिता फ्लिपकार्टची लगबग; ५० हजार जणांना देणार थेट रोजगार
खडकवासला धरण संपूर्ण भरल्यानंतर शहरातील मुळा-मुठा नदीतील पाण्याचा वेग वाढला होता. आता हळुहळू पाण्याची पातळी कमी होताच मंगळवारी पुन्हा पावसाने जोरदार एंट्री मारली आहे. काही दिवसांपासून उकाडा सहन करणारे पुणेकर आता थंड पावसाचा आनंद घेत आहेत.
हेही वाचा - दिब्रिटोंसारख्या धर्मांध व्यक्तीला मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करणे चुकीचे - ब्राम्हण महासंघ