ETV Bharat / state

चिंचवडमध्ये मुसळधार पावसामुळे पवना नदी तुडूंब; नदीकाठ झाले पिकनीक स्पॉट - पवना नदी

पिंपरी-चिंचवड भागात मुसळधार पाऊस होत असल्याने नागरिकांनी आज सुट्टीच्या दिवशी नदीकाठी एकच गर्दी केली. मुसळधार पाऊस झाल्याने दिवसाआड येणारे पाणी नियमित होईल अशी आशा नदीकाठी आलेल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नदीकाठ झालेत पिकनीक स्पॉट
author img

By

Published : Aug 4, 2019, 5:18 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे पवना नदी तुडूंब भरली आहे. नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. कित्येक वर्षांपासून अशा प्रकारचा मुसळधार पाऊस न झाल्याने नागरिक नदीकाठी पाणी पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.

नदीकाठ झालेत पिकनीक स्पॉट

आज रविवार असल्याने बहुतांश नागरिकांना सुट्टी आहे. कुटुंबासह पवना आणि मुळा नदी काठी येऊन पाण्याच्या ते मनसोक्त आनंद घेत आहेत. पिंपरी-चिंचवडच्या जुन्या सांगवी परिसरातून पवना नदी वाहते. गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने १४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे पवना नदी दुथडी भरून वाहात आहे. दरम्यान, आजही जुन्या सांगवी भागात पाणी आलेले नव्हते. त्यामुळे मुसळधार पाऊस झाल्याने दिवसा-आड येणारे पाणी नियमित होईल अशी आशा महिलांनी व्यक्त केली आहे. हे सर्व पाहता महानगरपालिका प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे आहे. अक्षरशः नागरिकांनी नदीच्या कडेला तोबा गर्दी केली होती. अनेक जण फोटो काढण्यात मग्न होते तर काहींना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. नदीकाठच्या नागरिकांनी आपला जीव धोक्यात येणार नाही याची काळजी घेऊन सतर्क राहावे.

Intro:mh_pun_01_common_man_avb_mhc10002Body:mh_pun_01_common_man_avb_mhc10002

Anchor:- पिंपरी-चिंचड शहरात गेल्या दोन दिवसांपासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे पवना नदी तुडुंब भरली आहे. नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. कित्येक वर्षांपासून अश्या प्रकारचा मुसळधार पाऊस न झाल्याने नागरिक नदीकाठी पाणी पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. आज रविवार असल्याने बहुतांश नागरिकांना सुट्टी आहे. ते कुटुंबासह पवना आणि मुळा नदी काठी येऊन पाण्याच्या मनसोक्त आनंद घेत आहेत. पिंपरी-चिंचवडच्या जुन्या सांगवी परिसरातून पवना नदी वाहते, गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने १४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे पवना नदी दुथडी भरून वाहात आहे. दरम्यान, आजही जुन्या सांगवी भागात पाणी आलेले नव्हते, त्यामुळे मुसळधार पाऊस झाल्याने दिवसा-आड येणारे पाणी नियमित होईल अशी आशा महिलांनी व्यक्त केली आहे. हे सर्व पाहता महानगरपालिका प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे आहे. अक्षरशः नागरिकांनी नदीच्या कडेला तोबा गर्दी केली होती. अनेक जण फोटो काढण्यात मग्न होते तर काहींना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. दरम्यान, नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे जेणे करून आपला जीव धोक्यात येणार नाही.

बाईट:- नागरिक

बाईट:- नागरिक

बाईट:- महिलाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.