पुणे: 'हर हर महादेव' (Har Har Mahadev movie ) या चित्रपटावरून राज्यांमध्ये चांगलेच वातावरण तापले होते. त्यानंतर तो चित्रपट प्रदर्शित (Har Har Mahadev movie controversy) झाला. नंतर काही राजकीय संघटनांनी आणि काही शिवप्रेमी संघटनांनी तो बंद पडला. त्यानंतर मनसेने तो टॉकीजमध्ये जाऊन चालू केला. त्यानंतर हा चित्रपट आता टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 18 तारखेला टीव्हीवर प्रदर्शित करणार आहे. परंतु त्या अगोदर या चित्रपटातील वादग्रस्त जे काही आहे ते बघून तुम्ही कसा चित्रपट तयार केला असा प्रश्न विचारण्यात येत आहे. हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला तर संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade strict role) ते होऊ देणार नसल्याचा इशारा (Crimes against Har Har Mahadev artists) देण्यात आला आहे. (Latest news from Pune)
चुकीचा इतिहास सर्वांपर्यंत जाऊ नये : 'हर हर महादेव' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वाद समोर आले. राष्ट्रवादीने त्याला विरोध केला. संभाजी ब्रिगेडने विरोध केला; मात्र मनसेने त्याला पाठिंबा देऊन यात काही वादग्रस्त नाही असे राज ठाकरे यांनी स्वतः भूमिका मांडली. त्यानंतर हा चित्रपट आता झी टॉकीज प्रदर्शित करणार आहे. चित्रपटातील चुकीचा इतिहास सर्वांपर्यंत जाऊ नये, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडची आहे .
संभाजी ब्रिगेडचा इशारा : चित्रपटाचे स्वातंत्र्य यांच्या नावाखाली तुम्ही काही दाखवू शकत नाही. त्याला काही मर्यादा आहेत आणि या चित्रपटावर जे दाखवले ते चुकीचे आहे असा आक्षेप स्वतः संभाजी राजे यांनी घेतलेला होता. त्यांनी स्वतः झी टॉकीजच्या या कार्यक्रमाला विरोध केला होता आणि हा चित्रपट प्रदर्शित करू नये अशी विनंतीसुद्धा केली होती; परंतु हा चित्रपट आता 18 तारखेला प्रदर्शित होतोय. तो टीव्हीवर प्रदर्शित होण्याच्या अगोदर आम्हाला दाखवूनच तो प्रदर्शित करा. अन्यथा महाराष्ट्रभर सर्वत्र तुमच्यासह सर्व कलाकारांवर संभाजी ब्रिगेड गुन्हे दाखल करेल असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.