ETV Bharat / state

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटखा वाहतूक...पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई - corona

याबाबत मानसिंग खुदहरणसिंग कुशवाहा (वय 50 रा.गाझीपुर उत्तर प्रदेश) आणि शीलदेव कृष्ण रेड्डी (राहणार सिकंदराबाद, हैदराबाद, तेलंगणा) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

gutkha seized
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटखा वाहतूक...
author img

By

Published : Apr 15, 2020, 2:38 PM IST

दौंड (पुणे)- अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटखा वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोवर पोलिसांनी कारवाई केली. यात 22.27 लाखांच्या गुटख्यासह 32.27 लाखांचा माल जप्त केला आहे .

पुणे ग्रामीण पोलिसांनी पाटस टोलनाका येथे आयशर टेम्पो ताब्यात घेत गुटख्यावर 14 एप्रिल रात्रीच्या वेळी कारवाई केली आहे. याबाबत दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटखा वाहतूक...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी आणि पोलीस जवान हे पेट्रोलिंग करत होते. यावेळी वाहने चेकिंग करीत असताना एका आयशर टेम्पोच्या हालचालीबाबत संशय आल्याने या टेम्पोच्या हालचालींवर लक्ष ठेऊन पाटस टोल नाका येथे पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली. यावेळी टेम्पो चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. गाडीत बिस्किटे आहेत, अशी माहिती दिली . यावेळी अधिक विचारपूस करून पोलिसांनी टेम्पो चेक केला. चेकिंग करणाऱ्या पोलिसांच्या लक्षात येऊ नये अशा पद्धतीने आतील बाजूस गुटख्याची पोती भरून मागच्या बाजूला बिस्कीटचे बॉक्स भरलेले पोलिसांना मिळून आले.
सिकंदराबाद (तेलंगणा) येथून पुण्याच्या दिशेने हा आयशर टेम्पो निघाला होता. टेम्पोच्या काचेवर अत्यावश्यक सेवा असा छापील बोर्ड लावला होता. हा टेम्पो तेलंगणा येथून 540 किलोमीटर प्रवास करून पाटसपर्यंत आला होता. या कालावधी दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात नाकाबंदीसाठी असलेल्या पोलिसांना चुकीची माहिती देऊन फसवणूक करून एवढे मोठे अंतर पार करून आला आहे. सदर आरोपींनी या वाहनाचा शासनाचा ऑनलाईन पाससुद्धा प्राप्त करून घेतला होता. याबाबत मानसिंग खुदहरणसिंग कुशवाहा (वय 50 रा.गाझीपूर उत्तर प्रदेश) आणि शीलदेव कृष्ण रेड्डी (रा. सिकंदराबाद, हैदराबाद, तेलंगणा) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी 22 लाख 27 हजार 500 रुपये किमतीचा गुटखा आणि 10 लाख रुपये किमतीची आयशर टेम्पो (टी एस - 10 , युए 6081 ) असा एकूण 32 लाख 27 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपींविरोधात अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व त्याखालील नियम 2011 अंतर्गत कलम 26(1) 26(2), 27(1)(2)(3),30(2)(a) भा द वि 420, 34, 177, 269, 270, 272, 273,188 साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 कलम 2,3,4 या प्रमाणे यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कामगिरी पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, चालक रमेश मोरे तसेच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक सोमनाथ वाघमोडे, रामदास घाडगे , पोलीस जवान संपत खबाले, रमेश कदम, जितेंद्र पानसरे, अजित काळे, प्रशांत कर्णवर यांनी केली आहे .या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक सोमनाथ वाघमोडे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.