पुणे- बंदूक खरी आहे की खोटी असे म्हणत असतानाचा अचानक झालेल्या गोळीबारात बंदुकधारीचा मित्र जखमी झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ही घटना घडली आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सनी परदेशी उर्फ रोकडे असे गोळीबार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर गुरुप्रित हरदेवसिंग असे जखमी मित्राचे नाव आहे. दोघे ही गुन्हेगार आहेत.
हेही वाचा- व्हायरल व्हिडिओ प्रकरण; अपायकारक भाज्या विकणाऱ्या 'त्या' विक्रेत्यावर गुन्हा दाखल
मध्यरात्री पिंपरीमधील डिलक्स चौकात सनी आणि गुरुप्रित रिक्षामध्ये मद्यपान करत बसले होते. दरम्यान, सनीने बंदूक काढली. मात्र, ती खोटी असल्याचे गुरुप्रित म्हणाला. यात दोघांच्या खऱ्या- खोट्यात अचानक बंदुकीतून गोळी सुटली. ती थेट गुरुप्रितच्या डाव्या खांद्याला लागली.
या घटनेनंतर सनी घाबरल्याने त्याने गुरुप्रितला तिथेच सोडून फरार झाला. दरम्यान, एका दुसऱ्या मित्राने गुरुप्रितला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, घटनेतील दोघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.