ETV Bharat / state

नाट्य संमेलनात अवधूत गुप्तेंच्या संगीत रजनीतील सुमधूर गाण्यांच्या तालावर प्रेक्षक फिदा - संगीत रजनी कार्यक्रम

100th Natya Sammelan: गणाधीशा.., राधा ही बावरी.., मधूबाला, काय सांगू राणी मला गाव सुटना... (Sangeet Rajni Program) अशी एकाहून एक बहारदार गाणी. अवधूत गुप्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सुरेल सादरीकरणाने शंभराव्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याची सांगता अविस्मरणीय ठरली. (Avadhoot Gupte)

Great response to Avadhoot Gupte
अवधूत गुप्ते
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 7:46 PM IST

पिंपरी चिंचवड (पुणे) 100th Natya Sammelan : नाट्य संमेलनात हस्तांतरण सोहळा झाल्यानंतर मुख्य सभामंडपात झालेल्या या संगीत रजनीला नाट्य संमेलनाचे (End of Natya Samamel) आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, युवा उद्योजक हर्षवर्धन भोईर आदि उपस्थित होते. (Mugdha Karhade)

'या' गाण्यांनी जिंकली प्रेक्षकांची मनं : अवधूत गुप्ते संगीत रजनीची सुरुवात पार्श्वगायिका मुग्धा कऱ्हाडे हिच्या 'ही गुलाबी हवा' या गाण्याने झाली. प्रेक्षकांना मुग्धाच्या सुंदर आवाजाने मंत्रमुग्ध केलं. पुढे लिटिल चॅम्प फेम कौस्तुभ गायकवाडने 'राधा ही बावरी' हे गाणं सादर करत रसिकांची मनं जिंकली. त्या नंतर गायिका मानसी घुले-भोईर यांनी 'आता गं बया का बावरलं' आणि सार्थक भोसलेच्या साथीने 'बहरला हा मधुमास नवा' हे गाणे सादर करत आपल्या आवाजाची जादू उपस्थित प्रेक्षकांना दाखवत त्यांची मनं जिंकली.

या गाण्यांना प्रेक्षकांचा प्रतिसाद : अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, गीतकार, संगीतकार आणि पार्श्वगायक अवधूत गुप्ते यांनी 'गणाधीश' या गाण्यातून श्री गणरायाला वंदन करत आपल्या गायनाची सुरुवात केली. पुढे त्यांचे गाजलेले 'तुझे देख के मेरी मधूबाला', 'सखे तुझ्या नावाचं गं वेड लागलं' ही गीतं सादर करत वातावरणात जोश निर्माण केला. त्यांनी 'काय सांगू राणी मला गाव सुटना' म्हणताच पिंपरी चिंचवडकरांनी एकच जल्लोष करत त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी अभिनेता प्रतीक लाड, गौरव मोरे, अभिनेत्री जुई आणि दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी एन्ट्री करत गाण्यात रंगत भरली. पुढे अवधूत आणि मुग्धा यांनी 'उन उन व्हटातून' हे गाणं सादर केलं. या बहारदार संगीत रजनीचे निवेदन अभिनेता पुष्कर श्रोत्री यानं केलं.

ढोल-ताशांच्या गजरात नाट्यदिंडी : ढोल, ताशा, लेझीम, गुलाबी फेटे, रांगोळ्यांच्या पायघड्या अन् रंगकर्मींच्या उपस्थितीत १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची नाट्य दिंडी 6 जानेवारी, 2024 रोजी काढण्यात आली. नाट्य कलावंतांसोबत पारंपरिक लोककला असलेल्या वासुदेव, पिंगळा, पोतराज, गोंधळी, दशावतार या लोककलाकारांच्या लोककलेनं ही नाट्य दिंडी सजली होती.

असंख्य नाट्य कलावंत सहभागी : मोरया गोसावी मंदिरापासून या नाट्य दिंडीला सुरूवात झाली. गांधी पेठ, तानाजी नगर मार्गे ही दिंडी श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलापर्यंत पोहचली. नाट्य दिंडीच्या सुरूवातीला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा पिंपरी- चिंचवडचे उपाध्यक्ष कृष्णकांत गोयल, कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल आणि असंख्य नाट्य कलावंत सहभागी झाले होते.

हेही वाचा:

  1. देवेंद्र फडणवीसांचे नाटक लवकरच कोसळणार - खासदार संजय राऊत
  2. पर्यटन व्यावसायिकांचा आता मालदीवला डच्चू, इतर पर्यटनस्थळांना प्राधान्य
  3. मेळघाटात सुरू झालेला सौरऊर्जा प्रकल्प 13 महिन्यांत पडला बंद; आदिवासी गावातील 'ऊर्जा' गायब

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.