पुणे Grain Portrait Of PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशासह विदेशात आकर्षण वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघातील भाजपा कार्यकर्ते तथा जय भवानी सहकारी बँकेचे संचालक राजेंद्र तरवडे यांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विविध धान्यापासून 18 बाय 10 आकाराचं 'पोर्ट्रेट' ( PM MODI Rangoli ) साकारण्यात आलं आहे. हे 'पोर्ट्रेट' सध्या आकर्षणाचं केंद्रबिंदू बनलं आहे.
धान्यापासून साकारलेले पहिलं पोर्ट्रेट : पुण्यातील कालिका माता मंदिर, तपकिर गल्ली, बुधवार पेठ, पुणे इथं या पोट्रेटचं अनावरण शुक्रवारी करण्यात आलं. अलीकडं रांगोळीच्या माध्यमातून अनेकदा 'पोर्ट्रेट' साकारलं जाते. मात्र हे धान्यापासून साकारलेलं पहिलं पोर्ट्रेट असून 16 ते 18 सप्टेंबर दरम्यान हे 'पोर्ट्रेट' काढण्यात आलं आहे. यासाठी दोन दिवस कष्ट घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आकर्षक असं 'पोर्ट्रेट' बनवण्यात आलं आहे.
अशी सूचली धान्यापासून पोर्ट्रेटची कल्पना : भारत हा कृषिप्रधान देश असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील 9 वर्षात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. या योजनांमधून त्यांनी शेतीला आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे. यामुळे त्यांच्या वाढदिवसाला शेतीशी निगडीत काहीतरी वेगळं करण्याचा आमचा विचार होता. त्यातून या पोर्ट्रेटची कल्पना समोर आल्याची माहिती राजेंद्र तरवडे यांनी दिली. विविध धान्याचा वापर करून निर्माण केलेलं हे 'पोर्ट्रेट' म्हणजे माझ्या सारख्या शेतकऱ्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेलं वंदन असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
या धान्याचा पोर्ट्रेट बनवताना केला वापर : गणेश खरे, सुधीर शिंदे आणि त्यांच्या टीमनं हे 'पोर्ट्रेट' साकारलं आहे. यासाठी 3 कलाकार काम करत होते. हे 'पोर्ट्रेट' साकारण्यासाठी एकूण 16 तासांचा कालावधी लागला आहे. या पोर्ट्रेटमध्ये गहू, तीन प्रकारचे तीळ, ज्वारी, डाळ, हळीव, मूग, मटकी यांचा वापर करण्यात आला आहे. एकूण 60 किलोपेक्षा जास्त धान्य लागल्याचंही राजेंद्र तरवडे यांनी सांगितलं. तसेच जास्तीत जास्त पुणेकरांनी हे पोर्ट्रेट बघायला यावं आणि या अभिनव कलेला दाद द्यावी असं आवाहनही राजेंद्र तरवडे यांनी केलं. तीन दिवसानंतर हे धान्य पक्षांना देण्यात येणार असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा :