ETV Bharat / entertainment

'देवरा पार्ट 1' पाहताना थिएटरमध्ये 'पुष्पा 2'चा टीझर पाहिल्यावर चाहते झाले उत्साहित, व्हिडिओ व्हायरल - pushpa 2 teaser - PUSHPA 2 TEASER

Pushpa 2 Teaser in Devara : ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा पार्ट 1' पाहताना थिएटरमध्ये 'पुष्पा 2'चा टीझर प्रदर्शित झाल्यानं चाहते उत्साहित झाले. यानंतर चित्रपटगृहामध्ये टाळ्यांचा कडकडाटात पाहायला मिळाला.

Pushpa 2 Teaser in Devara
देवरामधील पुष्पा 2 टीझर (देवरामधील पुष्पा 2 टीझर (Film Posters))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2024, 5:53 PM IST

मुंबई - Pushpa 2 Teaser in Devara : अभिनेता ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा पार्ट 1' या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक अखेर 27 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. प्रेक्षक या चित्रपटाची वाट आतुरतेनं पाहत होते. 'देवरा पार्ट 1' चित्रपटाला पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये खचाखच गर्दी आहे. दरम्यान अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'चा टीझर निर्मात्यांनी थिएटरमध्ये प्रेक्षकांना दाखवून एक सरप्राईज दिलंय. हा चित्रपट पाहात असताना प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस मिळाला आहे. 'पुष्पा 2'चा टीझर पाहून संपूर्ण चित्रपटगृह टाळ्यांच्या कडकडाटात झाला आणि प्रेक्षकांमध्ये आनंदाची लाट उसळली.

'पुष्पा 2'चा टीझर पाहून प्रेक्षक वेडे : 'देवरा पार्ट 1'च्या निर्मात्यांनी स्क्रिनिंगदरम्यान 'पुष्पा 2'चा टीझर दाखवून प्रेक्षकांना खुश केलं आहे. एका चित्रपटगृहामधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये 'पुष्पा 2'चा टीझर हा पडद्यावर दिसत आहे. हा टीझर पाहून अनेकजण यावेळी नाचले. आता प्रेक्षक 'पुष्पा 2' चित्रपटाच्या रिलीजची वाट आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन व्यतिरिक्त रश्मिका मंदाना आणि फहद फासिल हे मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुकुमार यांनी केलं आहे.

'देवरा पार्ट 1'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : दरम्यान 'देवरा पार्ट 1'नं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 172 कोटींची कमाई केली आहे. 'देवरा पार्ट 1' हा टॉलीवूडमधील यावर्षीचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. 'देवरा पार्ट 1'चं दिग्दर्शन कोराताला शिवा यांनी केलं आहे, ज्यात ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात त्यानं दुहेरी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत जान्हवी कपूर असून तिनं यातून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. सैफ अली खाननं 'देवरा पार्ट 1'मध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्यानं या चित्रपटामध्ये भैराची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 'देवरा पार्ट 1' चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण चित्रपटगृहांमध्ये गर्दी करताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. ज्यू. एनटीआरच्या 'देवरा' शोला उशीर झाल्यानं थिएटरमध्ये तोडफोड, पाहा व्हिडिओ - Devara screening vandalize
  2. जूनियर एनटीआर स्टारर 'देवरा पार्ट 1'नं बॉक्स ऑफिसवर केली मोठी ओपनिंग - Devara Box Office Collection
  3. ज्यू. एनटीआर सोलो हिरो म्हणून ग्रँड रिटर्न : 'देवरा: भाग 1' रचणार कमाईचा नवा विक्रम - Devara Box Office Collection

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.