ETV Bharat / state

ग्राहक पेठेतर्फे समाजातील योद्ध्यांना 'विघ्नहर्ता गणेशाची मृर्ती' भेट - ग्राहक पेठेकडून गणेश मूर्तींचे वाटप

पुणे येथील ग्राहक पेठेतर्फे समाजातील योद्ध्यांना विघ्नहर्ता गणेशाची मूर्ती भेट देण्यात आल्या. ग्राहक पेठ २११ शाडूच्या गणेश मूर्तींचे वितरण करणार आहे. विघ्नहर्ता गणेश केंद्राचे उद्घाटन व उपक्रमाचा शुभारंभ खडक पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लोहकरे यांच्या हस्ते झाला.

Grahak Peth distribute ganesh idols
ग्राहक पेठेतर्फे गणेश मूर्तीचे वाटप
author img

By

Published : Aug 20, 2020, 6:57 PM IST

पुणे- लॉकडाऊन काळात आर्थिक संकटात असलेल्या समाजातील अनेक घटकांना दानशूरांनी मदतीचा हात दिला आहे. गणेशोत्सवातही समाजासाठी अखंडपणे कार्य करणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणे येथील ग्राहक पेठेतर्फे समाजातील योद्ध्यांना विघ्नहर्ता गणेशाची मूर्ती भेट देण्यात आल्या. सुमारे २२१ शाडूच्या गणेश मूर्ती समाजातील या घटकांना देण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत पार पडला.

ग्राहक पेठेतर्फे गणेश मूर्तींचे वाटप

ग्राहक पेठेच्या खजिना विहीर चौकातील केंद्रामध्ये शाडूच्या २२१ गणेश मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. विघ्नहर्ता गणेश केंद्राचे उद्घाटन व उपक्रमाचा शुभारंभ खडक पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लोहकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, अनंत दळवी, शैलेश राणिम, उदय जोशी आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार, बँड वादक, पुरोहित, लिज्जत पापडचे कामगार, वस्ती विभागातील कार्यकर्ते, मंडप कामगार, तुळशीबागेतील कर्मचारी आदींना गणेश मूर्ती विनामूल्य देण्यात आल्या आहेत.

समाजातील विविध घटकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे, सूर्यकांत पाठक म्हणाले आहेत. पोलीस, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार, बँड वादक, पुरोहित यांनी या केंद्रामध्ये येऊन आवडेल ती गणेशमूर्ती घ्यावी आणि त्याची स्थापना या उत्सवात घरी करावी, ही यामागील संकल्पना आहे. अनेकांकडे उत्सव साजरा करण्याकरीता पुरेसे पैसे नाहीत, त्यामुळे त्यांना ग्राहक पेठ ही शाडूची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती भेट देत आहे.

कोरोनाच्या काळात पोलीस, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार यांसह अनेकांनी लढा दिला. गेल्या पाच महिन्यांमध्ये प्रत्येकाची आर्थिक घडी विस्कटली असून अशी अनेक कुटुंब आहेत, ज्यांच्याकडे गणेशोत्सव साजरा करण्याकरीता देखील पैसे नाहीत. त्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासोबतच कृतज्ञता भेट म्हणून ग्राहक पेठेतर्फे गणेश मूर्ती देण्याचा केलेला उपक्रम अभिनंदनीय आहे, असे चंद्रकांत लोहकरे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.