ETV Bharat / state

गिरीश कुबेरांच्या पुस्तकावर सरकारने कारवाई करावी - शेतकरी कामगार पक्ष

गिरीश कुबेरांच्या पुस्तकावर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Kuber book issue
गिरीश कुबेरांच्या पुस्तकावर सरकारने कारवाई करावी - शेतकरी कामगार पक्ष
author img

By

Published : Jun 12, 2021, 5:44 PM IST

पुणे - छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या गिरीश कुबेरांच्या पुस्तकावर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच पुस्तकातील वादग्रस्त मुद्दे मागे घेतले नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि गिरीश कुबेर यांना काळं फासू, असा इशाराही त्यांच्यावतीने देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया

'अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करू' -

गिरीश कुबेर यांनी 'रेनिसांस स्टेट' या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केली आहे. तसेच चुकीचा इतिहास जातीय मनोवृत्तीतून मांडणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुस्तकावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात पक्षातर्फे पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष राहुल पोकळे, इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे उपस्थित होते. दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु, मार्गदर्शक, शिक्षक किंवा मदतनीस नव्हते, हे इतिहास अभ्यासकांनी आणि महाराष्ट्र शासनाच्या पुरके समितीने सिध्द केलेले आहे. याबाबत महाराष्ट्रात सुमारे सात वर्षे वैचारिक वाद सुरु होता. तरी देखील कुबेर ओढून ताणून कोंडदेव यांना शिवाजी महाराज-जिजाऊमाँसाहेब यांच्या सोबत जोडतात, हा कुबेरांचा उध्दटपणा आणि विकृती आहे, असे भारतीय शेतकरी कामगार पक्षाने म्हटले आहे. कुबेरांची मांडणी शिवाजीराजे-जिजामातेची बदनामी करणारी आहे. संशोधन खूप पुढे गेले असताना कुबेर बदनामीकारक गरळ पुस्तकात ओकतातस, असे यावेळी सांगण्यात आले. तसेच कुबेरांवर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला.

हेही वाचा - #Weather update : मुंबईत जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी रस्ते जलमय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.