ETV Bharat / state

ज्येष्ठ पत्रकारांना लवकरच मिळणार सन्मान योजनेचा लाभ; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती - madha

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना लवकरच सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे, यासाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कार्यक्रमात दिली.

ज्येष्ठ पत्रकारांना लवकरच मिळणार सन्मान योजनेचा लाभ
author img

By

Published : Jun 23, 2019, 9:16 PM IST

Updated : Jun 23, 2019, 9:22 PM IST

पुणे - राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेसाठी २५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. पुढच्या महिन्यापर्यंत पहिल्या टप्प्यात अर्ज केलेल्या पत्रकारांना म्हाडाच्या विशेष योजनेचा लाभ मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सन १९४० ते २०१९ या आठ दशकांचा चित्रमय प्रवास असणाऱ्या “स्मृतिचित्रे” या स्मरणीकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते.

ज्येष्ठ पत्रकारांना लवकरच मिळणार सन्मान योजनेचा लाभ

यावेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, आमदार जगदीश मुळीक, मेधा कुलकर्णी, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार म्हाडाच्या विशेष योजनेद्वारे पुण्यातील पत्रकारांसाठी घरे उपलब्ध करून देण्यास तयार आहे. तसेच पुणे प्रेस क्लबसाठीही जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, देशात अनेक संस्था निर्माण झाल्या, त्या मोठ्याही झाल्या. मात्र, त्याच्या इतिहासाचे जतन करण्याचे काम आपल्याकडे फारसे झाले नाही. परदेशात मात्र संस्थांच्या इतिहासाचे योग्य प्रकारे जतन करण्यात येते. संघर्षाच्या काळात तसेच पुढील पिढीसाठी हा ऐतिहासिक दस्ताऐवज उपयुक्त ठरतो. पुणे श्रमिक पत्रकार संघाला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा ऐतिहासिक वारसा आहे. हा सर्व इतिहास संग्रहीत करून तो चित्ररूपाने प्रदर्शीत करण्याचा पत्रकार संघाचा हा उपक्रम अभिनव आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Intro:पुणे - राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेसाठी 25 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, पुढच्या महिन्यापर्यंत पहिल्या टप्प्यात अर्ज केलेल्या पत्रकारांना याचा लाभ मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Body:पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सन 1940 ते 2019 या आठ दशकांचा चित्रमय प्रवास असणाऱ्या “स्मृतिचित्रे” या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, आमदार जगदीश मुळीक, मेधा कुलकर्णी, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सरचिटणीस पांडुरंग सांडभोर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार म्हाडाच्या विशेष योजनेद्वारे पुण्यातील पत्रकारांसाठी घरे उपलब्ध करून देण्यास तयार आहे. तसेच पुणे प्रेस क्लबसाठीही जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
              
मुख्यमंत्री म्हणाले की, देशात अनेक संस्था निर्माण झाल्या, त्या मोठ्या झाल्या. मात्र, त्याच्या इतिहासाचे जतन करण्याचे काम आपल्याकडे फारसे झाले नाही. परदेशात मात्र संस्थांच्या इतिहासाचे योग्य प्रकारे जतन करण्यात येते. संघर्षाच्या काळात तसेच पुढील पिढीसाठी हा ऐतिहासिक दस्ताऐवज उपयुक्त ठरतो. पुणे श्रमिक पत्रकार संघाला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा ऐतिहासिक वारसा आहे. हा सर्व इतिहास संग्रहीत करून तो चित्ररूपाने प्रदर्शीत करण्याचा पत्रकार संघाचा हा उपक्रम अभिनव आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Conclusion:
Last Updated : Jun 23, 2019, 9:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.