पुणे - शहरातील खुनाचे सत्र सुरूच आहे. हडपसर परिसरातील दोन दिवसांपूर्वी झालेल्या खुनाची घटना ताजी असतानाच सोमवारी रात्री आणखी एका सराईत गुंडाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. बसवराज उर्फ बस्या कांबळे (वय 23) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बसवराज कांबळे हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. हडपसर परिसरातील 72 नामक ग्रुपचा तो अध्यक्ष असल्याचेही बोलले जाते. त्याच्या खुनाचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
तीन दिवसांपूर्वीच हडपसर परिसरातच शोएब शेख नामक गुन्हेगाराचा निघृन खून करण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी रात्री आणखी एका गुन्हेगाराचा खून झाल्याने खळबळ माजली आहे. गुंडांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचे या घटनांमधून अधोरेखित होत आहे.
पुण्यात बसवराज कांबळे नावाच्या गुंडाचा दगडाने ठेचून खून - क्राइम न्यूज पुणे
पुण्यात बसवराज कांबळे नावाच्या गुंडाची हत्या करण्यात आली आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.