ETV Bharat / state

नवलच.. बारामतीत चक्क बोकडाचा केक कापून दणक्यात साजरा झाला वाढदिवस - बारामतीत बोकडाचा वाढदिवस

बारामतीत सध्या बोकडाच्या वाढदिवसाची जोरदार चर्चा सुरू आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील तुकाराम खोमणे या शेतकऱ्याने आपल्या 'टायसन' नावाच्या बोकडाचा प्रथम वाढदिवस दणक्यात साजरा केला.

Goat birthday
बारामतीत चक्क बोकडाचा वाढदिवस
author img

By

Published : Jan 2, 2021, 9:57 PM IST

Updated : Jan 2, 2021, 10:10 PM IST

बारामती (पुणे) - बारामतीत सध्या बोकडाच्या वाढदिवसाची जोरदार चर्चा सुरू आहे. बळीराजा हा आपल्या कुटुंबातील सदस्यां इतकाच आपल्या जनावरांवरही प्रेम करतो. याची प्रचिती नुकतीच बारामतीकरांनी अनुभवली आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील तुकाराम खोमणे या शेतकऱ्याने आपल्या 'टायसन' नावाच्या बोकडाचा प्रथम वाढदिवस दणक्यात साजरा केला. इतकेच नव्हे तर या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेळीपालक व शेळीपालक तज्ज्ञांनी हजेरी लावली.

बारामतीत चक्क बोकडाचा वाढदिवस साजरा
चार महिन्यातच व्यवसायाचा बोलबाला..बोर जातीच्या या 'टायसन' नावाच्या बोकडाचे वजन जवळपास 90 किलो आहे. पारंपारिक शेळी व्यवसायात बदल करून खोमणे यांनी फलटण येथील निमकर गोट फार्म या संशोधन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली 2014 साली बोर जातीच्या शेळ्यांचा गोठा सुरू केला. या गोठ्यात त्यांनी हा बोकड योग्य पद्धतीने तयार केला. हा बोकड उत्तम वंशावळीचा व गुणवत्तेचा असल्याने अवघ्या चार सहा महिन्यातच खोमणे यांच्या शेळी व्यवसायाचा परिसरात बोलबाला झाला. म्हणूनच त्यांनी बोकडाचा वाढदिवस साजरा करण्याचा निश्चय केला.
Goat birthday
बारामतीत चक्क बोकडाचा वाढदिवस
वाढदिवसानिमित्त भोजनाची सोय..आजवर अनेक पाळीव प्राण्यांपैकी कुत्रा, मांजर, गाई, बैल यांचे वाढदिवस केल्याचे पहिले आहे. मात्र प्रथमच एका बोकडाचा वाढदिवस साजरा केल्याची ही दुर्मिळच घटना म्हणावी लागेल. खोमणे हे पशुपालनात एवढे हौशी आहेत की त्यांनी चक्क या बोकडाच्या वाढदिवसानिमित्त भोजनाचीही सोय केली होती.अशी आहे बोर जात..

बोर ही दक्षिण आफ्रिकेतील मांसासाठी प्रसिद्ध असलेल्या शेळीची जात आहे. 1992 साली पद्मश्री बन बिहारी विष्णुपंत निमकर यांनी बोरचा गर्भ आणून त्यांच्या फॉर्ममध्ये वाढविला. आता भारतभर बोर पसरत आहे. बोर ८० ते १५० किलोपर्यंत वाढू शकतात.

Last Updated : Jan 2, 2021, 10:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.