ETV Bharat / state

आम्हाला ही कायदेशीर संरक्षण द्या, सीरम इन्स्टिट्यूटची मागणी

कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे, जर फायझर आणि मॉर्डनासाठी कायदेशीर सुरक्षा पुरवली जात असेल तर सीरम इन्स्टिट्यूटसह लस बनवणाऱ्या इतर कंपन्यांना देखील अशा प्रकारची कायदेशीर सुरक्षा पुरवली पाहिजे, अशी सीरम इन्स्टिट्यूटची मागणी आहे.

आम्हाला ही कायदेशीर संरक्षण द्या, सिरम इन्स्टिट्युटची मागणी

author img

By

Published : Jun 3, 2021, 4:05 PM IST

पुणे - कोरोनावर लस बनवणाऱ्या फायझर आणि मॉर्डनासारख्या परदेशी कंपन्यांना भारतात कायदेशीर सुरक्षा मिळत असेल तर आमच्या कंपनीला ही कायदेशीर सुरक्षा द्यावी, अशी मागणी कोविशील्ड लस तयार करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून करण्यात आली आहे. कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे, जर फायझर आणि मॉर्डनासाठी कायदेशीर सुरक्षा पुरवली जात असेल तर सीरम इन्स्टिट्यूटसह लस बनवणाऱ्या इतर कंपन्यांना देखील अशा प्रकारची कायदेशीर सुरक्षा पुरवली पाहिजे, अशी सीरम इन्स्टिट्यूटची मागणी आहे.

लस दिल्यानंतर कोणी कुठली तक्रार केली तर त्याबाबत कंपनी उत्तरदायी नसेल

कोरोनावर लस बनवण्यात अग्रेसर असलेली भारतीय कंपनी सीरम इन्स्टिट्यूटकडून अस्ट्राझिनेका ऑक्सफोर्डच्या कोविशील्ड लसीचे उत्पादन केले जाते आहे. केंद्र सरकरकडून सध्या भारतात लस आणण्यासाठी विदेशी कंपन्या सोबत चर्चा सुरू आहे. यात विदेशी कंपन्याकडून कायदेशीर संरक्षणाच्या मागणी होते आहे, या कंपन्यांनी इतर ही देशात अशा प्रकारच्या कायदेशीर संरक्षणाची मागणी केली आहे. दरम्यान विदेशी कंपन्यांच्या या मागणीबाबत केंद्रीय आरोग्य विभाग सकारात्मक असल्याचे समोर येत असल्याने आता सीरम इन्स्टिट्यूटने देखील कायदेशीर संरक्षणाची मागणी केली आहे. या कायदेशीर संरक्षण अंतर्गत जर लस दिल्यानंतर कोणी कुठली तक्रार केली तर त्याबाबत कंपनी उत्तरदायी नसेल. त्यामुळे पुढे निर्माण होणाऱ्या कायदेशीर बाबीपासून या कंपन्यांना संरक्षण हवे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.