ETV Bharat / state

'दुधाला प्रतिलिटरमागे दहा रुपये अनुदान दिले पाहिजे'

आमचे सरकार असताना आम्ही तीन वर्षे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पाच रुपये अनुदान दिले. त्यावेळी थोडा भाव कमी होता. मात्र, आता तो एकदम खाली आला आहे. यावर दुसरा उपाय असा आहे, की दुधाची पावडर केली पाहिजे. तसेच ही पावडर निर्यात केली पाहिजे. जगातील भूकटीचे रेट पडल्यामुळे एक्स्पोर्ट करणाऱ्यांना 50 रुपये प्रति किलो अनुदान दिले तर भूकटी विदेशात जाईल. कोरोनामुळे विदेशात खूप अडचणी आहेत. पण एका किलोमागे 50 रुपये अनुदान दिल्याशिवाय जाणार नाही. अशा दोन्ही मार्गाने दूध व्यवसाय वाचवला पाहिजे

agitation by bjp pune
भाजपचे दुध अनुदानासाठी आंदोलन.
author img

By

Published : Aug 1, 2020, 1:13 PM IST

Updated : Aug 1, 2020, 2:06 PM IST

पुणे - कोरोनाच्या संकटात ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था दुधाच्या व्यवसायामुळे टिकली आहे. मात्र, गाईच्या दुधाचा भाव खूप खाली आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकरी वाचवण्यासाठी प्रती लिटर दुधाला दहा रुपये अनुदान दिले पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच हे अनुदान थेट खात्यात जमा केले पाहिजे, असेही पाटील म्हणाले. ते मावळमध्ये दूध दरवाढी संदर्भातील आंदोलनाच्या वेळी पत्रकारांशी बोलत होते.

'दुधाला प्रतिलिटरमागे दहा रुपये अनुदान दिले पाहिजे'

ते म्हणाले, आमचे सरकार असताना आम्ही तीन वर्षे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पाच रुपये अनुदान दिले. त्यावेळी थोडा भाव कमी होता. मात्र, आता तो एकदम खाली आला आहे. यावर दुसरा उपाय असा आहे, की दुधाची पावडर केली पाहिजे. तसेच ही पावडर निर्यात केली पाहिजे. जगातील भूकटीचे दर पडल्यामुळे निर्यात करणाऱ्यांना 50 रुपये प्रतिकिलो अनुदान दिले तर भूकटी विदेशात जाईल. कोरोनामुळे विदेशात खूप अडचणी आहेत. मात्र, एका किलोमागे 50 रुपये अनुदान दिल्याशिवाय जाणार नाही. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना दहा रुपये प्रति लीटर अनुदान देऊन या दोन्ही मार्गाने दूध व्यवसाय वाचवला पाहिजे. मात्र, सरकार या विषयामध्ये काही करायला तयार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न अजून सोडवले गेले नाहीत. त्यांना खत, बी-बियाणे मिळत नाही, बियाणे शेतकऱ्यांना फेक मिळत आहे. फेक बियाण्यांमुळे पिक उगवत नाही आहे. अनेकांची कर्जमाफी झाली नाही. नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळाले नाही. यामुळे हे असंवेदनशील सरकार आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा - अमरावतीत भाजपला आंदोलनासाठी दूध मिळेना; रिकामे कॅन घेऊन आंदोलन करण्याची वेळ

या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही 20 जुलैला एक इशारा आंदोलन केले. या आंदोलनाच्या माध्यमातून तहसिल आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यानंतर आज (शनिवारी) 43 हजार गावे आणि 27 हजार ग्रामपंचायतीतील सर्व दूध डेअरींना आवाहन करण्यात आले आहे की, आज एक कणही दूध संकलन होऊ द्यायचे नाही. दर हवा असेल तर एक कण ही दूध डेअरीला घालायचे नाही. ते घरी वापरा जास्त असेल तर लोकांना वाटा, असे आवाहन पाटील यांनी दूध आंदोलकांना केले आहे. गाईच्या दुधाला 30 रुपये प्रतिलीटर रुपये मिळाले पाहिजेत. 20 रुपये डेअरीकडून मिळत असतील तर दहा अनुदान द्या, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. तसेच हे आंदोलन हिंसक नाही. दूध रस्त्यावर ओता, शेतकऱ्यांना मारा, दूध टँकर फोडा, असे काहीही आम्ही करणार नाही, असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

Last Updated : Aug 1, 2020, 2:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.