ETV Bharat / state

Mahajan's problems increased : गिरीश महाजनांच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी टेम्पोभर कागदपत्रे घेतली ताब्यात

जळगावातील मराठा विद्या प्रसारक मंडळातील (Maratha Vidya Prasarak Mandal ) वादाच्या प्रकरणात पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Thane) गुन्हा दाखल आहे. रविवारी चौकशीसाठी जळगावात पोहोचलेल्या पुणे पोलिसांच्या टीमने अनेक ठिकाणी छापेमारी केली. यात तब्बल एक टेम्पो भरुन कागदपत्रे जप्त (documents seized ) केल्याची माहती आहे. या प्रकरणात भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

Girish Mahajan
गिरीश महाजन
author img

By

Published : Jan 11, 2022, 11:54 AM IST

Updated : Jan 11, 2022, 3:03 PM IST

पुणे: कोथरूड येथे दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत पुणे पोलिसांची टीम रविवारी जळगावात गेली होती. संस्थेशी संबंधित कागदपत्र भोईटे आणि आणखी एक आरोपी तानाजी यांच्या घरी मिळून आली. असे सांगितले जात आहे. ही कागदपत्रे संस्थेत असणे अपेक्षित होते मात्र, भोईटे आणि आणखी एका व्यक्तीच्या घरात ती सापडली आहेत. या कागदपत्रांतून मोठे पुरावे मिळण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण?
जळगाव येथील महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या वादातून विजय भास्कर पाटील यांनी माजी जलसंपदा मंत्री, आमदार गिरीश महाजन यांच्यासह भोईटे गटावर निंभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा गुन्हा कोथरुड पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे कोथरूड पोलिसांच्या पथकाने जळगावात जाऊन चौकशी केली आहे.

गुन्ह्याची नोंद झाली आहे

हेही वाचा-Minister Gulabrao Patil on Khadse & Mahajan : 'त्या' दोघांनी जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रर यावे - मंत्री गुलाबराव पाटील

कागदपत्रांमध्ये नेमके काय आहे, हे गुलदस्त्यात!

भाजपचे आमदार गिरीश महाजन ( BJP MLA Girish Mahajan ) संशयित असलेल्या कोथरुड पोलीस ठाण्यात ( Kothrud Police Station ) पुणे पोलिसांच्या पथकाने जळगावात ( Pune Police in Jalgaon ) चौकशी केली आहे. पथकाने जळगावात पाच जणांची चौकशी करत गाडीभर कागदपत्रे तसेच संगणक व इतर साहित्य जप्त केले आहे. जप्त गाडीभर मुद्देमाल घेवून वाहन पुण्याकडे रवाना ( Police left for Pune After taking Documents ) झाले. गाडीभर कागदपत्रांमध्ये नेमके काय आहे, हे गुलदस्त्यात असून त्याच्या चौकशीनंतर या गुन्ह्यात आमदार गिरीश महाजन यांसह आणखी काही राजकीय पुढारी यात अडकणार का, हे स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा-Pune Police in Jalgaon : मराठा विद्याप्रसारक संस्था वाद प्रकरण : गाडीभर कागदेपत्रे घेऊन पोलीस पुण्याला रवाना

मराठा विद्याप्रसारक संस्था वाद प्रकरण

मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वादप्रकरणी अॅड. विजय भास्करराव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल आमदार गिरीश महाजन, निलेश भोईटे यांच्यासह 29 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात चौकशीसाठी पुणे पोलिसांचे 50 जणांचे पथक जळगावात दोन दिवसांपासून ठाण मांडून होते. जळगावात पाच संशयितांकडे दोन दिवस कसून चौकशी करण्यात आली.

Last Updated : Jan 11, 2022, 3:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.