पुणे: घरातील तंटे, भांडणे, झगमगत्या दुनियेचे वेड, चैनी वस्तूंचा अट्टहास अशा अनेक कारणांमुळे शालेय तरुण वयोगटातील मुले रेल्वे स्थानक गाठतात. तर काही जण स्थानकांवर रेल्वेमध्येच हरवतात. रेल्वे स्थानक परिसर आणि प्लॅटफॉर्मवर आढळणाच्या मुलांना रेल्वे प्रशासनाकडून (Central Railway Security Force Squad) पालकांच्या हवाली करण्यात येते. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत तिकीट तपासणीस, पोलीस, सामाजिक संस्था आणि प्रवाशांच्या मदतीने सुमारे ८६४ बालकांना परिवाराकडे सुपूर्द केले (In the hands of parents) आहे. यामध्ये ५३५ मुले आणि ३२९ मुलींचा समावेश आहे. तर, नोव्हेंबरमध्ये मध्य रेल्वेने ७९ मुलांना पालकांकडे सुपूर्द केले. यात ५० मुले आणि २९ मुलींचा समावेश होता, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
नागरिकांना आवाहन
नागरिकांनी सतर्क राहून प्रवास करावा. या प्रकारच्या घटनांची माहिती ऑनड्युटी रेल्वे कर्मचाऱ्यांना द्यावी किंवा १०९८ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन पुणे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी केले आहे.
सापडलेल्या मुलांची आकडेवारी (जानेवारी ते नोव्हेंबर २०२१)
विभागः मुलेः मुली एकूण
मुंबई विभागः १९४ १२८ ३२२
पुणे विभागः २१२ ९४ ३०६
भुसावळ विभाग ७७ ५१ १२८
नागपूर विभाग २८ ३८ ६६
सोलापूर विभाग २४ १८ ४२
Gharvapsi Of Children: मध्य रेल्वेच्या पुणे विभागामुळे ३०० मुलांची घरवापसी - कौटुंबिक वाद
मध्य रेल्वेच्या सुरक्षा बलाच्या पथकाने (Central Railway Security Force Squad) हरवलेले, पळुन गेलेले तसेच अपहरण झालेल्या (Kidnapped children) ८६४ मुलांना शोध घेऊन त्यांची घरवापसी केली आहे. यात पुणे विभागातून ३०० पेक्षा जास्त बालके पालकांच्या स्वाधीन (In the hands of parents) करण्यात आली आहेत. अभ्यासाचा कंटाळा, कौटुंबिक वाद (Family disputes) आणि अन्य कारणात्सव लहान मुले घर सोडून निघून जातात. काही मुले पालकांच्या निष्काळजीपणामुळे हरवतात, तर काही वेळा मुलांचे अपहरण केले जाते.