ETV Bharat / state

Raigad Irshalgad Landslide: इर्शाळगडाच्या दुर्घटनेनंतर पश्चिम घाटावर शेती करतच राहिलो तर...

इर्शाळगडाच्या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. परंतु ही घटना का घडली याचा अभ्यास करणेसुद्धा गरजेचे आहे. यापूर्वीसुद्धा पुणे जिल्ह्यात माळीन आणि रायगड जिल्ह्यात तळई या ठिकाणीसुद्धा अशाच घटना घडल्या होत्या. परंतु घटनेनंतर फक्त उपाययोजना केल्या जातात. परंतु या घटना घडू नये म्हणून काय केले पाहिजे. याचे विश्लेषण श्रीकांत गबाळे भूगर्भ तज्ञ यांनी केले आहे.

Raigad Irshalgad Landslide
इर्शाळवाडी दरड दुर्घटना
author img

By

Published : Jul 20, 2023, 7:24 PM IST

माहिती देताना श्रीकांत गबाळे

पुणे : महाराष्ट्रातील पश्चिम घाटावर प्रामुख्याने पावसाचे प्रमाण जास्त असते. हा प्रदेश घाटमाथ्याचा असल्याने, या ठिकाणी शेती करण्यायोग्य जमीन नसल्याने तिथे आपल्याला शेती करता येत नाही. परंतु गेल्या काही दिवसात विकास म्हणून रायगड जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिकांनी या डोंगर माथ्यावर शेती करण्यास सुरू केलेली आहे. हा संपूर्ण घाट असल्याने हळूहळू याचा मलदा साचत गेला. एका ठराविक वेळेनंतर याची क्षमता संपल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असतात. असे भूगर्भ तज्ञ सांगतात.

विभिन्न भौगोलिक रचना : अशा घटना घडू नये म्हणून या भागामध्ये शेती करण्यायोग्य जमीन नसल्याने याचाही विचार करणे आता गरजेचे आहे. नाहीतर आपण महाराष्ट्रातल्या अनेक नागरिकांना अशाच समस्यांना सामोरे जावे लागेल. त्याचबरोबर या भागांमधली भौगोलिक रचना ही पावसाळ्यामध्ये सातत्याने दरड कोसळल्याने बदल झाली आहे. त्याचबरोबर नागरिकांनी या ठिकाणची झाडे तोडलेली आहेत या भागाचा जर पूर्वइतिहास पहिला तर हा संपूर्ण भाग हा झाडांनी व्यापलेला होता. परंतु ती झाडे नाहीसी झाली. त्यानंतर नागरिक तिथे शेती करू लागले. वरून येणारा जो मातीचा भाग, तो भाग खाली घसरत घसरत येऊ लागला. पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडत असतात.

निसर्गाचा होतो ऱ्हास : या ठिकाणी बेसाल्ट नावाचा खडक आहे. बेसाल्ट नावाच्या खडकामध्ये माती किंवा इतर पदार्थ थांबून ठेवण्याची क्षमता ही एका मर्यादित काळापुरतेच असते. त्यानंतर बेसाल्टसुद्धा त्यामध्ये विरघळून त्याची माती बनण्यास सुरुवात होते, किंवा ती माती बेसाल्टवरून खाली घसरते. हळूहळू घसरून अशा प्रकारे वरून पावसाचा मारा आणि खालून बेसाल्टची क्षमता संपल्याने घसरत जात असलेली माती, यामुळे असे गावेच्या गावे गाडली जाण्याची भीती जास्त आहे. आता फक्त आपल्याकडे आतापर्यंत तीन गावे जरी या डोंगरमध्ये गाडली गेली असली तरी, यापुढेसुद्धा जवळपास 50 ते 70 अशा घटना घडू शकतात. अशी भौगोलिक रचना आता सध्या दिसत आहे. त्यामुळे आता तरी आपण सर्वांनी सावध होऊन याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. विकास म्हणून निसर्गाचा ऱ्हास करण्यापेक्षा निसर्गाला जपणे हेच आपले खरे काम आहे. तेव्हाच सुखी, समृद्ध जीवन तिथल्या नागरिकांना सुद्धा जगता येणार आहे. नाहीतर अशा घटना सातत्याने घडू शकतात. अशी प्रतिक्रिया भूगर्भ तज्ञ श्रीकांत गबाळे यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Irshalwadi Landslide : 19 जुलै अनेकांसाठी शेवटची रात्र, इर्शाळवाडीतील नागरिकांवर कोसळला दुःखाचा डोंगर; मुख्यमंत्री घटनास्थळी
  2. CM Shinde On Irshalwadi : मुख्यमंत्री शिंदे दीड तास चालत पोहोचले इर्शाळवाडीत; मदतकार्याचा घेतला आढावा
  3. Irshalgad Landslide : इर्शाळवाडीत बचावकार्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.