पुणे - पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसंदर्भात भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत्या बुधवारी (२५ नोव्हेंबर) ला चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित -
पुणे पदवीधर मतदार संघाचे भाजपा उमेदवार संग्राम दादा देशमुख व पुणे शिक्षक मतदार संघाचे भाजपा उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
भाजपा कार्यकर्त्यांसह आमदार, महापौरांची उपस्थिती -
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे, चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, महापौर माई ढोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे उमेदवार व शहरातील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महानगरपालिकेचे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली आहे.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकी संदर्भात चिंचवडमध्ये मेळावा - पुणे पदवीधर मतदार संघ मेळावा
येत्या १ डिसेंबरला राज्यात पदवीधर व शिक्षक मतदार संघांची निवडणूक होत आहे. त्यासाठी सर्व पक्ष आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत. चिंचवडमध्ये भाजपाने तर मार्गदर्शनासाठी एका मेळावाचे आयोजनच केले आहे.