ETV Bharat / state

गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला, पाण्याचा विसर्ग कमी केला - heavy rain

रविवारपेक्षा गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. मात्र, नाशिक शहरामध्ये पावसाची संततधार सुरुच आहे.

गोदावरी
author img

By

Published : Aug 5, 2019, 12:19 PM IST

Updated : Aug 5, 2019, 3:14 PM IST

नाशिक - नाशिकच्या गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. रविवारपेक्षा गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली असून पुराची तीव्रता कमी झाली आहे. मात्र, नाशिक शहरामध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. रामकुंड येथील दुतोंड्या मारुतीची मूर्ती अजूनही पाण्यात बुडालेली आहे. तसेच रामसेतू पूल देखिल पाण्याखाली आहे. पावसाची संततधार जर अशीच सुरू राहिली तर पुन्हा एकदा गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढून नदीकाठच्या नागरिकांच्या समस्या वाढू शकतात.

गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला

पावसामुळे आज(सोमवारी) नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पूर भागात नियमांचे उल्लंघन केलेल्या 24 नागरिकांवर पोलिसांनी कलम 144 अंतर्गत कारवाई केली आहे. त्यामुळे पूर बघण्याची होणारी गर्दी कमी झाली आहे.

कुठल्या धरणांतून किती विसर्ग होतोय..

गंगापुर धरण 18909 क्युसेक
दारणा धरण 40342 क्युसेक
नांदुर मध्यमेश्वर धरण 269298
भावली धरण 2152 क्युसेक
आळंदी धरण 4500 क्युसेक
पालखेड धरण 46170 क्युसेक
चणकापूर धरण 11883 क्युसेक
हरणबारी धरण 5548 क्युसेक
पुणेगाव धरण 5673 क्युसेक
होळकर पुलाखालून 25833 क्युसेक

Intro:गंगापूर धरणं क्षेत्रात पावसाचा जोर कमी, गंगापुर धरणातून पाण्याचा कमी करण्यात आला...

Body:नाशिकच्या गंगापूर धरणं क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे, कालपेक्षा गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली असून पुराची तीव्रता देखील कमी झाली आहे ,मात्र नाशिक शहरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे,रामकुंड येथील दुतोंड्या मारुतीची मूर्ती अजूनही बुडालेली आहे, तसेच रामसेतू पुल देखिल पाण्याखाली आहे,तसेच शहरातील रस्त्यावरील पाणी कमी झाले आहे, पावसाची संततधार जर अशीच सुरू राहिली तर पुन्हा एकदा तर गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी वाढून नदीकाठ्याच्या नागरिकांच्या समस्या वाढू शकता..

जोरदार पावसामुळे आज नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, मात्र संततधार पावसामुळे आज देखील शहरातील जनजीवन काही प्रमाणत विस्कळीत झालेला दिसून आलं,पूर भागात नियमांचे उल्लंघन केलेल्या 24 नागरिकांवर पोलिसांनी कलम 144 अंतर्गत कारवाई केल्यामुळे पूर बघण्याची गर्दी देखील कमी दिसून आली..
wkt कपिल भास्कर प्रतिनिधी नाशिक

कुठल्या धरणांतून किती विसर्ग होतोय..
गंगापुर धरणं 18909 क्युसेस
दारणा धरण 40342 क्युसेस
नांदुर मध्यमेश्वर धरण 269298
भावली धरण 2152 क्युसेस
आळंदी धरण 4500 क्युसेस
पालखेड धरण 46170 क्युसेस
चणकापूर धरण 11883 क्युसेस
हरणबारी धरण 5548 क्युसेस
पुणेगाव धरण 5673 क्युसेस
होळकर पुलाखालून 25833 क्युसेस

Conclusion:
Last Updated : Aug 5, 2019, 3:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.