पुणे (पिंपरी) - पिंपरीत टोळक्यांचा धुडगूस काही थांबेना असे दिसत आहे. आताही 100 जणांच्या टोळक्याने दोन गटात झालेल्या किरकोळ वादातून धुडगूस घातला. पिंपरीतील नेहरूनगर येथे 10 वाहनांची या टोळक्याने तोडफोड केली. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेश मंजुळे, असे मुख्य आरोपीचे नाव असून त्याचा शोध सुरू आहे. पोलीस उपायुक्त इप्पर यांनी ही माहिती दिली.
पिंपरी-चिंचवड शहरात वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. सर्वसामान्य जनतेच्या वाहनांची तोडफोड केल्याने मोठे नुकसान झाले असून त्याची भरपाई कोण देणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
यापूर्वी सांगवी परिसरात अज्ञात तिघांनी 24 चारचाकी वाहनांची तोडफोड केली होती. यात स्कूल बस, रुग्णवाहिकेचा देखील समावेश होता. आता पुन्हा 100 जणांच्या टोळक्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान केले. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
भोसरीत देखील घडला होता वाहनांच्या तोडफोडीचा प्रकार
जून महिन्यात भोसरीच्या दिघी रोड परिसरात अज्ञात टोळक्याने दहशत पसरवत आठ वाहनांची तोडफोड केली होती. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या सीसीटीव्ही फुटेजवरून भोसरी पोलिसांनी तपास केला. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलासे यांच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी समीर रासकर आणि सुमित देवकर यांनी ६ आरोपींना अटक केली होती.
हेही वाचा- तुर्कस्तानात भूकंप : मृतांची संख्या 19 वर तर 709 जण जखमी, बचावकार्य सुरू
हेही वाचा- दहा रुपयांच्या माव्यावरून मित्राचा घेतला जीव; चापट मारून मृत्यू झाल्याने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा