पुणे - गुरे बांधायला गोठ्यात गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झल्याची धक्कादायक घटना पुण्यातील भोर तालुक्यातील भांबवडे या गावात घडली आहे. 29 वर्षीय शेतकरी महिलेने या प्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. दोघा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
पीडितेच्या तक्रारीवरून राजगड पोलिसांनी हनुमंत दिनकर कापरे, अनिल शंकर वाडकर, महेश नामदेव सोनवणे या तीन आरोपी विरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-बांसुरी स्वराज यांनी स्वीकारला आईचा पद्मविभूषण सन्मान; पी व्ही सिंधू, कंगना रणौतचाही "पद्म"ने गौरव!
नेमके काय घडले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी महिला आपल्या गोठ्यात गुरे बांधत असताना त्या ठिकाणी आरोपी अनिल वाडकर आणि महेश सोनवणे दाखल झाले. त्यांनी गोठ्याच्या दाराची कडी लावून आरोपी अनिल वाडकर आणि महेश सोनवणे यांनी पीडित महिलेवर सामूहिक बलात्कार केला.
हेही वाचा-नोटाबंदीच्या निर्णयाला 5 वर्षे पूर्ण; डिजीटल व्यवहारासह चलनातील नोटांमध्येही वाढ
आरोपींना तातडीने अटक
दरम्यान 10 ऑक्टोबर 2021 ते 5 नोव्हेंबर 2021 या काळात ही घटना घडल्याचा दावा केला जात आहे. गुन्ह्याचे गांभीर्य पाहून राजगड पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंग प्रकरणी तिघा आरोपींना तातडीने अटक केली आहे.
हेही वाचा-राफेल सौद्यात डस्सॉल्ट कंपनीकडून भारतीय दलालाला 65 कोटींची लाच-रिपोर्ट
औरंगाबाद जिल्ह्यात सावत्र वडिलाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार-
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच सावत्र वडिलांनी आणि त्याच्या मित्राने बलात्कार केल्याचा खळजनक प्रकार घडला आहे. हा प्रकार 2 नोव्हेंबर उघडकीला आला आहे. एक महिन्यापासून नराधम आरोपी त्या पीडित मुलीचे शोषण करत होता. जन्मदात्या आईनेही या कृत्याबाबत कोणताही विरोध केला नाही. पण नराधम आरोपींनी आणि तिच्या आईने पीडित मुलीच्या गुप्तांगात मिरची टाकण्याचा घृणास्पद प्रकार केला आहे.