पुणे : यंदाच्या पावसाळ्यात राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळाला. तर काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याचे पाहायला मिळाले. मागच्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात पूर आला. जिथे सर्वाधिक बाप्पाच्या मुर्त्या बनविल्या जातात त्या पेनमध्ये देखील पूर आल्याने, अनेक मुर्ती या भिजल्या आहेत. तर काही शाडूच्या मूर्ती पाण्यातच विघळ्या आहेत. यामुळे मूर्ती कमी प्रमाणात बाजारात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे बाप्पांच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे.
बाजारात कमी मुर्त्या दाखल : गणेशोत्सव म्हटल की, पुणे शहरातील गणेशोत्सव खूपच प्रसिद्ध आहे. देशभरातील नव्हे तर जगभरातील लोक पुण्याचे गणेशोत्सव पाहण्यासाठी पुण्यात येत असतात. तसेच पुण्यात मंडळांच्या व्यतिरिक्त घरगुती बाप्पा देखील मोठ्या संख्येने लोक बसवत असतात. दरवर्षी हजारोच्या संख्येने पुणेकर नागरिक हे आपापल्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करतात. त्यामुळे दरवर्षी हजारोच्या संख्येने विविध ठिकाणांहून बाप्पाच्या मूर्ती बाजारात येतात. पण यंदा रायगड येथे पावसामुळे आलेल्या पुरामुळे मूर्ती या ओल्या झाल्या तर काही वाहून गेल्याने यंदा पुण्यात 50 ते 60 टक्केच मूर्ती दाखल झाले आहे. त्यामुळे मुर्त्यांची किंमत देखील वाढले असेल जवळपास किमतीमध्ये 20 टक्के एवढी वाढ झाली आहे.
मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात : पुढच्या महिन्यातील 19 सप्टेंबर पासून सर्वत्र गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या एक ते दिड महिन्याआधीच पुणे शहरातील विविध बाजारपेठेत बाप्पाच्या मूर्ती सजलेल्या पाहायला मिळतात. पण यंदा अजूनही बाप्पाच्या मूर्तीच्या कलरचे काम सुरू आहे. काम अंतिम टप्प्यात आले असून पुढील आठवड्यापर्यंत बाजार सजलेले पाहायला मिळणार आहे. रायगड येथे आलेल्या पुरामुळे बापाच्या मूर्ती ओल्या झाल्या असल्याने, ते सुकायला उशीर झाला आहे. यंदा उशिरापर्यंत मूर्तीच काम सुरू असल्याचे मुर्तिकरांच्या वतीने सांगण्यात येत आहे.
या मूर्तीला जास्त मागणी : पुण्यातील श्री मूर्ती वाले म्हणाले की, यावर्षी गणेशोत्सव उशीरा आल्याने मूर्तीच्या कामाला देखील उशीर झाला आहे. अधिक महिना आल्याने उशीर झाला आहे. आत्ता मूर्त्यांच्या कलरचे काम सुरू आहे. ग्राहक हे विचारून जात आहे. यंदाच्या वर्षी दगडूशेठ गणपती, तसेच चिंतामणी गणपती बाप्पाच्या मूर्तींना क्रेझ जास्त आहे. नागरिक या मूर्तींच्या बाबतीत जास्त विचारपूस करत आहे. तसेच पिओपीच्या मूर्तीला परवानगी मिळाल्याने, पिओपीच्या मूर्तीला देखील जास्त मागणी असल्याचे यावेळी श्रद्धा शिंदे म्हणाल्या.
हेही वाचा -