पुणे : यावर्षी पुण्यातील मानाचा पाचवा केसरी वाडा गणेशोत्सवाची सुरुवात एक महिना अगोदरच झाली आहे. आज गणेशाची ढोल ताशाच्या गजरात केसरी वाड्यामध्ये स्थापना करण्यात आली आहे. टिळक पंचांगानुसार अधिक महिना आल्याने, एक महिना अगोदर हा गणेशोत्सव साजरा केला जातो. जर तीन वर्षांनी या गणेशाची एक महिना अगोदर स्थापना होऊन गणेशोत्सवास प्रारंभ होतो. मात्र विसर्जन हे आनंद चतुर्थी दिवशीच करत असल्याचे दीपक टिळक यांनी सांगितले आहे.
महिनाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन : गणेश उत्सवाला एक महिना असला तरी, केसरी वाड्यातील गणेश उत्सवाला आज पासून सुरुवात झाली. आजपासून एक महिनाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याची माहिती, दीपक टिळक यांनी दिली आहे. तसेच वेगवेगळ्या पूजा, सामाजिक उपक्रमही यावेळी राबविण्यात येणार आहेत.
गणेशाची काढण्यात आली मिरवणूक : आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान ढोल ताशाच्या गजरामध्ये श्री गणेशाची मिरवणूक काढण्यात आली असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुणेकर सहभागी झाले होते. एक महिना अगोदरच गणेशोत्सव सुरू होत असल्याने, भाविकांमध्ये सुद्धा आनंद दिसून येत आहे. केसरी वाड्यातून सकाळी साडेनऊला ढोल ताशाच्या गजरात गणेशाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये दीपक टिळक, रोहित टिळक, टिळक कुटुंबातील सर्व सदस्य त्याचबरोबर केसरी संस्थेतील तसेच टिळक विद्यापीठातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
पुणे शहरात देखाव्याची लगबग : गणेश उत्सव अवघ्या एका महिन्यावर आलेला आहे. सगळेच कलाकार गणेश उत्सवासाठी तयारी करत आहेत. गणेशोत्सवातलं मुख्य आकर्षण म्हणजे गणेश मंडळाचे देखावे असतात. पुणे शहरात देखाव्याची लगबग आता सुरू झाली आहे. जवळपास 70 ते 80 टक्के काम आता पूर्ण झाले आहे.
हेही वाचा -