ETV Bharat / state

गणेश जन्मोत्सव : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पुष्पवृष्टी आणि गणरायाचा जयघोष उत्सव साजरा - ganesh janmotsav pune latest news

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने विनायक अवतार गणेशजन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला. अर्चना भालेराव यांनी गणेशजन्म सोहळ्यात महिलांचे प्रतिनिधीत्व केले. यावेळी अथर्वशिर्ष सादर करण्यात आले.

dagdusheth halwai ganesh temple
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर
author img

By

Published : Feb 15, 2021, 4:04 PM IST

Updated : Feb 15, 2021, 6:44 PM IST

पुणे : 'गजवदना पतित पावना...बाळा जो जो रे...निद्रा करी बाळा, मृत्युंजय नंदना बाळा जो जो रे...', असा पाळणा म्हणत पारंपरिक वेशातील महिलांनी गणेशजन्म सोहळ्यात सहभागी होत जन्मोत्सव साजरा केला. पाळण्यावर केलेली पुष्पवृष्टी आणि ओम् गं गणपतये नम:च्या मंगल स्वरांनी दुपारी ठीक 12 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात मोठ्या थाटात गणेश जन्म पार पडला. मंदिरावर केलेली आकर्षक सजावट आणि गाभाऱ्यात केलेली पुष्पआरास डोळ्यात साठवत गणेशभक्तांनी बाप्पाचरणी उत्तम आरोग्याकरीता प्रार्थना केली.

मंदिराचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी याबाबत माहिती देताना.

महिलांच्यावतीने अथर्वशीष पठन -

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने विनायक अवतार गणेशजन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला. अर्चना भालेराव यांनी गणेशजन्म सोहळ्यात महिलांचे प्रतिनिधीत्व केले. यावेळी अथर्वशिर्ष सादर करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, प्रकाश चव्हाण, ,सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, यतीश रासने यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. शारदा गोडसे, संगीता रासने, ज्योती सूर्यवंशी, मृणालिनी रासने यांनी गणरायाचे पूजन केले.

हेही वाचा - पेट्रोलची शंभरी; राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीत, नागरिक संतप्त

पहाटे स्वराभिषेकद्वारे गायन सेवा -

सोमवारी पहाटे 4 ते सकाळी 6 यावेळेत इंडियन आयडॉल फेम नंदिनी आणि अंगद गायकवाड यांनी श्री चरणी स्वराभिषेकाद्वारे गायनसेवा अर्पण केली. स्वराभिषेकातून विविध प्रकारची गीते ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळाली. प्रात:कालीन आरती सकाळी 7.15वाजता झाली.

दिवसभर विविध कार्यक्रम -

दिवसभरात सकाळी 7 ते 1.30 आणि दुपारी 1.30 ते सायंकाळी 5 यावेळेत गणेश भक्तांच्या हस्ते गणेशयाग पार पडला. दुपारी 3 ते सायंकाळी 6 यावेळेत सहस्त्रावर्तने झाली. तर, रात्री 10 ते पहाटे 3 वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला होता. मंदिराला आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली.

Last Updated : Feb 15, 2021, 6:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.