ETV Bharat / state

लॉकडाऊन काळात ५०० लोकांना शिवभोजन; राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचा उपक्रम - Shiv pratishthan

गरजू लोकांची गैरसोय टाळण्यासाठी मोफत ७५ शिवभोजन थाळी ऐवजी २०० ते ५०० लोकांना राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने शिवभोजन थाळी देण्यात येणार आहे, अशी माहिती नारायणगावचे सरपंच बाबू उर्फ योगेश पाटे यांनी दिली.

लॉकडाऊन काळात ५०० लोकांना शिवभोजन
लॉकडाऊन काळात ५०० लोकांना शिवभोजन
author img

By

Published : Apr 26, 2021, 11:25 AM IST

नारायणगाव (पुणे) - राज्यात महाविकास आघाडी सरकारने गोरगरीब जनतेसाठी शिवभोजन योजना सुरू केली. कोरोनामुळे लॉकडाऊन काळात ही थाळी मोफत देण्यात येत आहे. मात्र तिची संख्या मार्यदित आहे. त्यामुळे त्याच धर्तीवर दररोज २०० ते ५०० लोकांना राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने शिवभोजन देण्याची योजना नारायणगावात सुरू करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमुळे अनेक गरीब आणि गरजू लोकांची गैरसोय टाळण्यासाठी मोफत ७५ शिवभोजन थाळी ऐवजी २०० ते ५०० लोकांना राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने शिवभोजन थाळी देण्यात येणार आहे, अशी माहिती नारायणगावचे सरपंच बाबू उर्फ योगेश पाटे यांनी दिली. शुक्रवारी नारायणगाव बसस्थानकासमोर हे शिवभोजन देण्याचा शुभारंभ झाला. प्रतिष्ठानचे संस्थापक सरपंच बाबू उर्फ योगेश पाटे यांच्या हस्ते गरिबांना थाळी देऊन उपक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी आशिष माळवदकर, आरिफ आतार, संतोष पाटे, संतोष दांगट, अनिल खैरे, राजेश बाप्ते, राजूशेठ पाटे, निलेश जाधव, मयूर विटे, आकाश कानसकर, जालिंदर खैर, ईश्वर पाटे आदी उपस्थित होते.

एक दिवसही शिवभोजन थाळी बंद नाही

राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात १० एप्रिल २०२० पासून शिवभोजन थाळी देण्यात येत आहे. त्याला एक वर्ष झाले आहे, आजपर्यंत एक दिवसही शिवभोजन थाळी बंद नाही. गरीब, गरजू लोकासाठी ७५ लोकांसाठी शिवभोजन थाळीची मान्यता आहे. मात्र सध्याची कोविडमधील लोकांचे झालेले हाल व त्यांची गरज ओळखून प्रतिष्ठानच्या वतीने २०० ते ५०० लोकांना विनामूल्य शिवभोजन थाळी दिली जात आहे.

पायी जाणाऱ्याना बसस्थानकाजवळ शिवभोजन-

आजपासून ग्रामपंचायत कार्यालयातून या थाळीचे वाटप करण्यात येणार आहे. गर्दी वाढली तर प्रभाग निहाय थाळीचे वाटप केले जाईल. रस्त्याने पायी जाणाऱ्या कुटुंबाना बसस्थानकाजवळ शिवभोजन थाळी देण्यात येईल, अशी माहिती सरपंच योगेश पोटे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.