पुणे - नाशिक महामार्गावर राजगुरूनगरजवळ आज(23 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अपघातग्रस्त वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, या अपघातामुळे पुणे-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
हेही वाचा - पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर भीषण अपघात; एक ठार, ५ जखमी
एका मालवाहक ट्रकने सलग चार वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. यामध्ये एका अपघातग्रस्त गाडीत असणाऱ्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दरम्यान, महामार्गावर नेहमीच्याच असणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.