ETV Bharat / state

पुण्यात ऑनर किलिंगचा प्रयत्न, आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तरुणावर गोळीबार - crime

शहरातील चांदणी चौक येथे ऑनर किलिंगचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी चांदणी चौक येथे ४ जणांनी एका तरुणावर गोळीबार केला होता. हा हल्ला आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून झाल्याचे समोर आले आहे.

पुण्यात ऑनर किलिंगचा प्रयत्न
author img

By

Published : May 9, 2019, 5:36 PM IST

Updated : May 9, 2019, 5:50 PM IST

पुणे - शहरातील चांदणी चौक येथे ऑनर किलिंगचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी चांदणी चौक येथे ४ जणांनी एका तरुणावर गोळीबार केला होता. हा हल्ला आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून झाल्याचे समोर आले आहे. तुषार प्रकाश पिसाळ या तरुणावर गोळीबार करण्यात आला.

तुषार प्रकाश पिसाळ याच्यावर बुधवारी चौदणी चोक येथे गोळीबार करण्यात आला होता. या हल्लात तुषार बचावला असून, त्याच्यावर पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तुषार हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रांजे गावातला राहणारा आहे. त्याच गावातील तरुणीशी त्याचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, हा आंतरजातीय विवाह असल्याने तरुणीच्या कुटुंबीयांचा त्याला विरोध होता. याच रागातून बुधवारी सायंकाळी तुषार हा मित्रांसह भुगाव येथे आलेला असताना त्याच्यावर पुण्यातल्या चांदणी चौकात ४ जणांनी गोळीबार केला. तुषारच्या सख्या आणि चुलत मेव्हण्यांनी हा गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुण्यात ऑनर किलिंगचा प्रयत्न

तुषारवर ४ गोळ्या झाडण्यात आल्या. यामद्ये तो जबर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू तावरे, आकाश आणि सागर तावरे यांनी तुषारला ठार करायची योजना आखली होती. त्यानुसार बुधवारी तुषार हा खेड शिवापूर येथून भुगाव येथे विवाह समारंभासाठी आला होता. त्याच्या मागावर आरोपी होते. विवाह समारंभ आटोपून तो मित्रांसह एका दुचाकीवरून चांदणी चौकात आला. वळणाचा रस्ता येताच त्याच्या मागावर असलेल्या चौघांपैकी एकाने तुषारवर पाठीमागून चार गोळ्या झाडल्या. तुषारच्या छातीत, पोटात आणि मानेवर गोळ्या लागल्या. घटना घडताच तुषारच्या दोन्ही मित्रांनी घटनस्थळावरून पळ काढला. जखमी तुषारला तातडीने तेथील नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

Intro:mh pune 02 09 honer killing case avb
Body:mh pune 02 09 honer killing case avb 7201348

anchor
ऑनर किलिंगच्या घटना राज्यात काही ठिकाणी घडलेल्या असतानाच पुणे जिल्ह्यात ही ऑनर किलिंगचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडलीय
पुण्यातील चांदणी चौक येथे बुधवारी चार जणांनी एका तरुणावर गोळीबार केला होता. हा हल्ला आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून झाल्याचं समोर आलं आहे. तुषार प्रकाश पिसाळ याच्यावर हा गोळीबार करण्यात आला होता या हल्लात तुषार बचावला असून त्याच्यावर पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत....तुषार हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या रांजे गावातला राहणारा आहे त्याच गावातील तरुणीशी त्याचा प्रेमविवाह झालेला होता मात्र हा आंतरजातीय विवाह असल्याने तरुणीच्या कुटूंबियाचा त्याला विरोध होता आणि या रागातून बुधवारी सायंकाळी तुषार हा मित्रांसह भुगाव इथे आलेला असताना त्याच्यावर पुण्यातल्या चांदणी चौकात चार जणांनी गोळीबार केला तुषारचे सख्ख्या आणि चुलत मेव्हन्यांनी हा गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले
त्याच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या यात तो जबर जखमी झालाय, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू तावरे आकाश आणि सागर तावरे यांनी तुषार याला ठार करायची योजना आखली होती. त्यानुसार बुधवारी तुषार हा खेड शिवापूर येथून भुगाव येथे विवाह समारंभासाठी आला होता. त्याच्या मागावर आरोपी होते. विवाह समारंभ आटोपून तो मित्रांसह एका दुचाकीवरून चांदणी चौकात आला वळणाचा रस्ता येताच त्याच्या मागावर असलेल्या चौघांपैकी एकाने तुषारवर पाठीमागून चार गोळ्या झाडल्या तुषारच्या छातीत, पोटात आणि मानेवर गोळ्या लागल्या. तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला हे बघून दोन्ही मित्रांनी घटनस्थळावरून पळ काढला. जखमी तुषारला तातडीने तेथील नागरिकांनी रुग्णालयात दाखल केल सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.
Byte विनायक ढाकणे, डीसीपी
Byte तुषारचा चुलत भाऊ
Conclusion:
Last Updated : May 9, 2019, 5:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.