ETV Bharat / state

Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू; दिवसभरात आढळले ३४ रुग्ण

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. मंगळवारी दिवसभरात ४ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ३४ बाधित रुग्ण आढळले आहेत.

author img

By

Published : Jun 2, 2020, 7:27 PM IST

Pimpri-Chinchwad Corona News
पिंपरी-चिंचवड कोरोना बातमी

पुणे - पिंपरी-चिंचवड शहराची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज दिवसभरात ३४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यातील १० रुग्ण हे शहराच्या हद्दी बाहेरील आहेत. त्याच बरोबर आज ४ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरातील बाधितांची एकूण संख्या ५५९ वर पोहचली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. मंगळवारी दिवसभरात ४ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ३४ बाधित रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत शहरातील दहा तर शहरा बाहेरील १४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बाधितांची संख्या ५५९ झाली आहे.

दरम्यान, आज ७ रुग्ण हे कोरोनामुक्त झालेले आहेत. आत्तापर्यंत २८३ जणांना कोरोनामुक्त करण्यात आले आहे. आज बाधित आढळले रुग्ण हे आनंदनगर, वाकड, पिंपळे सौदागर, काळेवाडी, भोसरी, दापोडी, पिंपरी, किवळे, सांगवी, अजंठानगर, कसबा पेठ, आंबेगांव, दौंड, खडकी, देहूरोड या परिसरातील रहिवाशी आहेत.

आज मृत्यू झालेले रुग्ण हे वाल्हेकरवाडी स्त्री (वय-४० वर्षे), दापोडी येथील स्त्री (वय- ५५ वर्षे), मंगळवार पेठ पुणे पुरुष (वय- ७९ वर्षे) आणि दौंड येथील पुरुष (वय- ६५ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.