ETV Bharat / politics

कोल्हापूरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना दाखवले काळे झेंडे; पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट - Rahul Gandhi Kolhapur

काँग्रेस नेते राहुल गांधी हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला आहे.

bjp opposes congress leader rahul gandhi visit to kolhapur by showing black flags
भाजपा कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना दाखवले काळे झेंडे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2024, 1:42 PM IST

कोल्हापूर : लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आज (5 ऑक्टोबर) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील भगवा चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाचं अनावरण त्यांच्या हस्ते झालं. मात्र, राहुल गांधींच्या या दौऱ्याला भाजपाकडून जोरदार विरोध होत असल्याचं पाहायला मिळतंय. भाजपा कार्यकर्त्यांनी आज राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या जवळच अडवलं. यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली.

नेमकं काय घडलं? : आज कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले होते. अमेरिकेत आरक्षणाविषयी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना भाजपा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, राहुल गांधी यांचं आगमन होण्यापूर्वीच पोलिसांनी भाजपा कार्यालयातच कार्यकर्त्यांना घेरलं. राहुल गांधी यांचं कोल्हापुरात आगमन होताच ते उचगाव येथे कार्यकर्त्याच्या घरी भेटीला गेले. परंतु, दुसऱ्या बाजूला राहुल यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपा कार्यकर्ते नगाळा पार्क येथील त्यांच्या कार्यालयात निषेध करण्यासाठी एकत्र जमा झाले. त्यानंतर ते ताराराणी चौकाकडे रवाना झाले.

पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट : यावेळी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीही झाली. मात्र, कार्यकर्ते गेट तोडून आंदोलन करण्यासाठी मुख्य रस्त्याकडं धावले. यावेळी पोलिसांनी अडवल्यानं भाजपा कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी राहुल गांधींविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. तब्बल अर्धा ते पाऊण तास सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान भाजपा वरिष्ठांनी जिल्हाध्यक्षांना फोन करून आंदोलन स्थगित करण्यास सांगितल्यानंतर सुरू असलेलं आंदोलन स्थगित करण्यात आलं.

हेही वाचा -

  1. राहुल गांधी यांचा भाजपावर हल्लाबोल; शिवरायांचा पुतळा पडण्याचं सांगितलं कारण - Rahul Gandhi Reach At Kolhapur
  2. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी राहुल गांधींना बजावले समन्स - Vinayak Savarkar Defamation Case
  3. "मोदीजी! तुमचा अहंकारही मोडेल...", सोनम वांगचुकच्या अटकेवरुन राहुल गांधी संतापले - Police Detain Sonam Wangchuk
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.