पिंपरी चिंचवड सलग सहावेळा शिरूर विधानसभा मतदारसंघातून Shirur Assembly Constituency निवडणूक लढविणारे आणि त्यातील दोन वेळा विजय प्राप्त करणारे माजी आमदार बाबूराव काशीनाथ पाचर्णे वयाच्या ७१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले पुत्र राहुल पाचर्णे एक मुलगी जावई कर्नल महेश शेळके नातवंडे चार भाऊ पाच बहिणी असा परिवार आहे पाचर्णे यांच्या निधनाने शिरूर तालुक्यावर व विशेषतः शिरूर पंचक्रोशीवर शोककळा Former BJP MLA Baburao Pacharne Passed Away पसरली.
शिरूर तालुक्यातील भाजपचा मोठा चेहरा शिरूर तालुक्यातील भाजपचा मोठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. बाबुराव पाचर्णे यांनी 2004 ते 2009 आणि 2014 ते 2019 या कालावधीत शिरूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीदरम्यानच त्यांच्या प्रकृतीविषयी कुरबुरी सुरू झाल्या होत्या त्या निवडणुकीतील पराभवानंतर ते राजकारणातून काहीसे अलिप्त झाले होते दीड वर्षापूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते यादरम्यान त्यांच्या प्रकृतीत अनेकदा चढउतार झाले परंतु दीड वर्षाच्या या कालावधीत कर्करोगाने ग्रासल्याने त्यांचे इतर अवयवही निकामी होत गेले आणि आज अखेर येथील खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली
शेतकरी कुटुंबात जन्म तालुक्यातील तर्डोबाची वाडी या एका छोट्याशा वाडीतील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबूराव पाचर्णे यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती राजकारणात कुणीही मार्गदर्शक नसताना त्यांनी गावपातळीपासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरवात केली व थेट तालुक्याच्या राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते शिरूर ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरवात झाली सन १९७८ ते ८४ या काळात ते ग्रामपंचायत सदस्य होते
शेतकऱ्यांच्या मुलांना व्यवसाय उभा करून दिला शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर विजय मिळवित त्यांनी तालुका पातळीवरील राजकारणात प्रवेश केला २८ जानेवारी १९८५ ते २२ जुलै १९९३ अशी सलग आठ वर्षे बाजार समितीचे सभापतीपद भूषविण्याची संधी त्यांना मिळाली या काळात त्यांनी अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले भव्य दिव्य व्यापारी संकुल उभे करून शेतकऱ्यांच्या मुलांना विविध व्यवसायासाठी गाळे उपलब्ध करून दिले १९९३ ला झालेल्या बाजार समितीच्या निवडणूकीत ते पुन्हा संचालक म्हणून निवडून आले
पंचायत समितीत विजय १९९२ च्या पंचायत समिती निवडणुकीत एकतर्फी विजय मिळाल्यानंतर तेच सभापती होतील असे चित्र होते मात्र राजकीय तडजोडीत त्यांची संधी हुकली. पुढे १९९५ ला त्यांनी प्रथम विधानसभेची निवडणूक लढविली जवळपास निश्चीत झालेली कॉंग्रेसची उमेदवारी ऐनवेळी कापली गेल्याने त्यांनी अपक्ष म्हणून प्रबळ आव्हान उभे केले होते त्या निवडणुकीत केवळ ६७८ मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. १९९९ ची निवडणूक त्यांनी कॉंग्रेसकडून लढविली मात्र त्या निवडणुकीतही त्यांना यश मिळाले नाही दोन वेळा यशाने हुलकावणी दिल्यावर २००४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा अपेक्षेप्रमाणे उमेदवारीबरोबरच यशही त्यांच्या पदरात पडले
अपक्ष निवडणूक लढविली २००९ च्या निवडणूकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पुन्हा अपक्ष निवडणूक लढविली आणि तेथेही त्यांना अपयशाचे तोंड पहावे लागले. २०१४ च्या निवडणूकीत त्यांनी पुन्हा स्वगृही म्हणजे भाजपत प्रवेश केला आणि उमेदवारीबरोबरच पुन्हा यशही खेचून आणले राजकीय कारकिर्दीतील शेवटच्या ठरलेल्या सन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांना अपयशाचे तोंड पाहावे लागले घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक असलेल्या पाचर्णे यांनी १९९७ ते ९९ या काळात ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले विद्याभारती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष असलेल्या पाचर्णे यांनी विविध शैक्षणिक सामाजिक संस्थांवर प्रतिनिधीत्व केले काही काळ त्यांनी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्षपदही भूषविले
दीर्घ आजाराने निधन 2014 विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अशोक पवार यांना हरवून विजय मिळवला होता त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत पाचर्णे यांचा अशोक पवार यांच्याकडून पराभव झाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी बाबुराव पाचर्णे यांची शिरूर येथे रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती गेल्या दोन वर्षांपासून ते गंभीर आजाराने ग्रस्त होते मात्र काही दिवसांपासून त्यांचा आजार बळावला आणि प्रकृती ढासळली त्यातच बाबुराव पाचर्णे यांची शिरूर येथे प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे
हेही वाचा Mukesh Ambani Threat Case मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्या आरोपीला 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी