ETV Bharat / state

काँग्रेसला धक्का.. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बुधवारी करणार भाजपमध्ये प्रवेश

बुधवारी दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

माजी आमदार हर्षवर्धन पाटील
author img

By

Published : Sep 10, 2019, 5:41 PM IST

Updated : Sep 10, 2019, 6:13 PM IST

पुणे - जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. बुधवारी दुपारी मुंबईत हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील बुधवारी करणार भाजपमध्ये प्रवेश

हेही वाचा - पवारांना सांगा पुन्हा युतीचेच सरकार येणार आहे; चंद्रकांत पाटलांचा टोला

गेल्या काही काळापासून हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये जाणार याची चर्चा सुरू होती. आगामी भूमिका काय असावी यासाठी पाटील यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या समर्थकांचा मेळावा देखील आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांच्या समर्थकांनी एकमुखाने भाजपमध्ये जाण्याची जोरदार मागणी केली होती. या मेळाव्यानंतर लवकरच आपण निर्णय घेऊ, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले होते.

हेही वाचा - भीमा-कोरेगाव: दिल्ली विद्यापीठाचे प्रा. हनी बाबूंच्या घरी पुणे पोलिसांचा छापा

हर्षवर्धन पाटील यांच्या या प्रवेशासाठी इंदापूर परिसरातील त्यांचे समर्थक मुंबईला जाण्याच्या तयारीत आहेत. आघाडीमध्ये इंदापूरची जागा कोणाकडे? यावरून वाद सुरू होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून इंदापूर या जागेवर दावा सांगितला जात असल्याने हर्षवर्धन पाटील संभ्रमात होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेळोवेळी आपली फसवणूक केल्याचे त्यांनी समर्थकांच्या मेळाव्यात म्हटले होते. लोकसभेच्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांना मदत करण्याच्या बदल्यात इंदापूरची जागा हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सोडली जाईल, असे आश्वासन देऊनही आपली फसवणूक झाल्याचे त्यांनी या मेळाव्यात सांगितले होते. त्यामुळे आता काँग्रेस सोडण्याशिवाय पर्याय नसल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी एक प्रकारे समर्थकांच्या माध्यमातून सांगितले होते.

हेही वाचा - पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला 'गुडबाय'

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी इंदापूरच्या जागेबाबत अद्यापही काही बोलणे झालेले नाही. दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते यावर निर्णय घेतील, असे सांगितले होते. मात्र, अखेर हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून बुधवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Intro:पुणे जिल्ह्यात काँग्रेसला धक्का, हर्षवर्धन पाटील बुधवारी भाजप मध्ये प्रवेश करणारBody:mh_pun_04_harshwardhan_patil_bjp_pravesh_av_7201348

anchor
पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि इंदापूर चे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे बुधवारी दुपारी मुंबईमध्ये हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहे बुधवारी दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत गेल्या काही काळापासून हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये जाणार याची चर्चा सुरू होती आगामी भूमिका काय असावी यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या समर्थकांचा मेळावा देखील आयोजित केला होता या मेळाव्यात त्यांच्या समर्थकांनी एक मुखाने भाजपमध्ये जाण्याची जोरदार मागणी केली होती या मेळाव्यानंतर लवकरच आपण निर्णय घेऊ असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं होतं बुधवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे हर्षवर्धन पाटील यांच्या या प्रवेशाला साठी इंदापूर परिसरातील त्यांचे समर्थक मुंबईला जाण्याचे तयारीत आहेत आघाडीमध्ये इंदापूर ची जागा कोणाकडे यावरून वाद सुरू होता राष्ट्रवादी काँग्रेस कडून इंदापूर या जागेवर दावा सांगितला जात असल्याने असल्याने हर्षवर्धन पाटील संभ्रमात होते राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेळोवेळी आपली फसवणूक केल्याचं त्यांनी समर्थकांच्या मेळाव्यात म्हटलं होतं लोकसभेच्या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांना मदत करण्याच्या बदल्यात इंदापूर ची जागा हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सोडली जाईल असा आश्वासन देऊनही आपली फसवणूक झाल्याचं त्यांनी या मेळाव्यात सांगितले होते त्यामुळे आता काँग्रेस सोडण्याशिवाय पर्याय नसल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी एका प्रकारे समर्थकांच्या माध्यमातून वदवून घेतले होते दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी इंदापूरच्या जागेबाबत अद्यापही काही बोलणे झाले नाही दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते यावर निर्णय घेतील असे सांगितले होते मात्र अखेर हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून बुधवारी ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशीच चिन्हे आहेत..Conclusion:
Last Updated : Sep 10, 2019, 6:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.