ETV Bharat / state

पिंपरीत भाजपच्या माजी उपमहापौरांना खंडणी प्रकरणी बेड्या

पिंपरी - चिंचवडमध्ये भाजपचे माजी उपमहापौर ( Former Deputy Mayor of BJP Keshav gholve arrested ) यांना पिंपरी पोलिसांनी खंडणी प्रकरणी अटक केली आहे. केशव घोळवे, असे विद्यमान नगरसेवक आणि माजी उपमहापौरांचे नाव आहे. महानगर पालिकेचे गाळे मिळवून देतो, असे म्हणून 55 हजारांची खंडणी घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

BJP Keshav gholve arrested by Pimpri police
केशव घोळवे अटक पिंपरी पोलीस
author img

By

Published : Feb 2, 2022, 4:52 PM IST

पुणे - पिंपरी - चिंचवडमध्ये भाजपचे माजी उपमहापौर यांना पिंपरी ( Former Deputy Mayor of BJP Keshav gholve arrested ) पोलिसांनी खंडणी प्रकरणी अटक केली आहे. केशव घोळवे, असे विद्यमान नगरसेवक आणि माजी उपमहापौरांचे नाव आहे. महानगर पालिकेचे गाळे मिळवून देतो, असे म्हणून 55 हजारांची खंडणी घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. घोळवे यांच्यासह इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज त्यांना मोरवाडी, पिंपरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले, अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली.

आरोपीला नेताना पोलीस

हेही वाचा - cow baby shower ceremony : पोटच्या पोरीप्रमाणे गाईचं डोहाळं जेवण, शिरूर तालुक्यातील शिंदे कुटुंबाचं स्तुत्य उपक्रम

या प्रकरणी गुड्डू उर्फ प्रमोद यादव, घनशाम यादव, मलका यादव, केशव घोळवे आणि हसरत अली शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी 45 वर्षीय व्यक्तीने पिंपरी पोलिसात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळी मार्केट येथील जागा ही मेट्रो प्रकल्पात जात आहे. त्यामुळे फिर्यादी आणि इतर व्यापाऱ्यांना शंभर गाळे प्रशासनामार्फत देण्यात येणार आहेत. परंतु, त्यांना महानगर पालिकेकडून गाळे मिळवून देतो, असे सांगून त्यांना दरवर्षी भाजप कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संस्थेत बाराशे रुपयांची पावती फाडण्यास सांगितली, असे म्हणून आमची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच, शासनाकडून गाळे मिळवून देण्याच्या बहाण्याने फिर्यादीकडून 55 हजारांची खंडणी घेतली. दरम्यान, आणखी काही लाख रुपये मागितले असता फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, अस पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा - पुणे : मुळशी येथून बेपत्ता झालेल्या ५ मुलांपैकी ३ मुले सापडली, २ मुलांचा शोध सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.